सांगोला – बलवडी ता.सांगोला येथे श्री सिद्धनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात पार पडला. काल्याच्या कीर्तनात पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी ता.तासगाव या संस्थेचे साडेसात हजार स्केअर फुट बांधकाम झाले. याचे मोठे श्रेय बलवडी वाल्यांचे आहे व त्यामुळे या गावास मी विसरू शकणार नाही.
जगात चंद्र, सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत बलवडी येथील सिद्धनाथ जन्माष्टमी सोहळा होणार व मी येणारच अशी ग्वाही हभप.आकाश पाटील महाराज यांनी दिली. यावेळी सिद्धनाथ जन्माष्टमी कमिटी व ग्रामस्था यांच्या तर्फे पाटील महाराज, देणगीदार व किर्तन सौजन्यदार यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
सप्ताहात नवनाथ ग्रंथ सामुदायिक वाचन सोहळा संपन्न झाला. तसेच सुप्रियाताई बंडगर, हनुमंत पाटील महाराज, झावरे महाराज, माऊली महाराज, अर्पिताताई अमराळे, गणेश महाराज, कैलास महाराज यांची किर्तन रुपी सेवा संपन्न झाली.
















