सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ सोलापूर विभाग अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत सोलापूर, धाराशिव, लातूर,नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील संघांनी सहभाग नोंदवला होता.
ए. जी. पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्तम संघभावना व कौशल्य दाखवत सर्व सामने जिंकले. त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सचिव शिवानंद पाटील, कॅम्पस डायरेक्ट डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, क्रीडा संचालक प्रा. शिवशरण कोरे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर परिवाराने विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
या उल्लेखनीय यशामुळे ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने सोलापूर झोनमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले असून आगामी आंतर विभागीय स्पर्धेसाठी पूर्वा लिगाडे, साक्षी पाटील, ओंकार पवार, अजिंक्य कांबळे, चंद्रकांत हन्नूरे या खेळाडूंची निवड झाली आहे.
*फोटो ओळी :- विजेत्या संघासोबत क्रीडा संचालक प्रा. शिवशरण कोरे, संस्था सचिव शिवानंद पाटील, कॅम्पस डायरेक्ट डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार*

















