सोलापूर – जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, गवंडी वस्ती नाविंदगी शाळेची विद्यार्थीनीं कु.संगीता गवंडी केंद्रस्तरीय टॅलेंट हंट निबंध स्पर्धेमध्ये प्रथम तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर 2025 रोजी नागणसूर केंद्राचे टॅलेंट हंट स्पर्धा जि.प.प्रा कन्नड शाळा नागणसूर येथे मा. गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या आदेशानुसार केंद्रप्रमुख गजा यांच्या नियोजनाखाली संपन्न झाली. या स्पर्धेत गवंडी वस्तीची संगीता सुरेश गवंडी हिने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक तर वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. गवंडी वस्तीच्या विद्यार्थ्याने छोट्या गटात निबंध कथाकथन, चित्रकला, वक्तृत्व ,समूह गीत गायन या स्पर्धेत सहभाग नोंदवून नागणसूर केंद्राचे लक्ष वेधले. संगीताला नागनाथ म्हमाणे, सायबण्णा गवंडी ,शिवाजी वसपटे यांनी मार्गदर्शन केले .
संगीताचे कौतुक व पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, नावदगी गावचे सरपंच पंडित चव्हण, लक्काप्पा पुजारी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी ,माजी केंद्रप्रमुख कृष्णात मोरे,केंद्रप्रमुख गजा, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बसवराज खिल्लारी, तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष शंकर आजागोंडे, गवंडी वस्ती नाविंदगी, शा व्य.समिती अध्यक्ष हनुमंत मुनाळे, माझी मुख्याध्यापक बसवराज गवंडी, नाविंदगी मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीणकुमार जाधव यांनी शुभेच्छा दिल्या .



















