सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यानी महानगरपालिका उर्दू मुले कॅम्प शाळेला भेट देऊन परिसर पाहणी केली. वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कॅम्प प्रशाला परिसर पूर्ण पाहणी करून मुख्याध्यापक व इतरांना सूचना केल्या. यावेळी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक भगवान मुंडे, मनपा उर्दू मुले कॅम्प शाळेच्या मुख्याध्यापिका माहेजबीन मुल्ला, मनपा उर्दू मुली कॅम्प शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन कोरबू, मनपा उर्दू कॅम्प प्रशालेचे मुख्याध्यापक हारून बंदूकवाले, मनपा मराठी कॅम्प प्रशाला 1 चे मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे डाटा एन्ट्री ऑपरेटरचे अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.


















