पूर्णा / परभणी – तालुक्यातील डोंगराळे येथील निष्पाप चिमुकली. कु. यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर अत्याचार करून निर्दयी हत्येचा १९ नोव्हेंबर बुधवार रोजी स्वर्णकार समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.या बाबत पूर्णा येथे बंद पाळून निवेदन देण्यात आले.
हे कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा, तात्काळ फाशी देणेच हा न्याय असू शकतो.
या प्रकरणाची जलदगती सुनावणी करून आरोपीवर त्वरित कठोर कारवाई व्हायला करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तहसीलदार माधव बोथीकर यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.या वेळी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सराफा बाजार बंद या घटनेच्या निषेधार्थ पूर्णा सराफा व्यापाऱ्यांच्या वतीने बंद पाळण्यात आला.दिवसभर सराफा बाजार बंद होता.
















