सांगोला – सांगोला तालुक्यातील चोपडी गावचे सुपुत्र प्रतीक दत्तात्रय बाबर यांची ई.एम.ई सेंटर सिकंदराबाद येथे अग्नीवर टेक्निकल पदावर निवड झाली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जिद्द आणि चिकटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नांमध्ये त्यांनी हे यश संपादन केले. त्यांच्या वडिलांनी पण सैन्य दलात सेवा केली होती. यानिवडीबद्दल भोजलिंग यात्रा कमिटी रानमळा, चोपडी यांच्यावतीने प्रतीक बाबर यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सैनिक अमोल बाबर, चंद्रकांत बाबर, दिलीप बाबर गुरुजी यांनी मनोगतातून प्रतीक बाबर यांच्या यशाचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना प्रतीक बाबर यांनी तरुणांनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करावी असा मौलिक सल्ला दिला. यावेळी अनेक मान्यवर, महिला भगिनी, युवावर्ग उपस्थित होते.
















