Monday, June 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अस्वच्छता, दुर्गंधीने चढला परिवहनमंत्री “सरनाईकांचा” पारा

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – धाराशिव जिल्ह्याला जाताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर बसस्थानकाची धावती भेट  घेत परिसराची पाहणी केली. परिवहन मंत्र्यांनी तिसऱ्यांदा सोलापूर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी परिवहन मंत्र्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्याचे नूर बदलले.” कपाळावर आठ्या अन् चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू “जमा झाले.

सर्वत्र अस्वच्छता दुर्गंधी आणि कामातील दिरंगाई ढिलेपणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम जुंदळे यांना नोटीस बजावली. मात्र या कारवाईत बसस्थानक प्रमुख जाधव अधिकाऱ्यांच्या पाठीमागे दिसून आले. वास्तविक पाहता स्थानकाची जबाबदारी जाधव यांच्यावर असताना तोफेच्या तोंडी जुंदळे यांना दिल्याची चर्चा स्थानक परिसरात ऐकण्यास मिळाली. 

   

“सकाळी साडेदहा वाजण्याची वेळ…अचानक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर बसस्थानकावर येणार असल्याची दवंडी मिळाली. लागोलाग अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. सार्वजनिक स्वच्छतागृह, कॅन्टीन, कर्मचाऱ्यांचे विश्रामगृह, प्रवाशांसाठीचे वाहनतळ, आदीं परिसरात लागलीच झाडून लोटून सारा परिसर चकाचक करण्यात आला. वरवरचे दिखावेपण परिवहन मंत्र्यांनी घेरले. त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सुनावले.

“मी येणार म्हणून पावडर टाकून स्वच्छता केली का? बस स्थानकाची काय अवस्था बनवली आहे. तुम्ही स्वतःचे घर समजून स्वच्छता करा. अशा दुर्गंधीत अस्वच्छ ठिकाणी पिण्याचे पाणी असून, तुम्ही स्वतःच येथे पाणी पिऊ शकता का? अशा प्रश्नांची सरबत्ती परिवहन मंत्र्यांनी सुरू केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू जमा झाले. अंगाचा थरका उडाला आणि तोंडातून चकार शब्द निघेना.”आठ दिवसांचा अल्टिमेट देऊन स्थानक परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचे आदेश यावेळी सरनाईक यांनी दिले. 

 

तसेच भरारी पथकाद्वारे याची पाहणी केली जाईल. कामात अनियमतता आणि ढिलाई आढळल्यास तत्काळ नोटीस बजावली जाईल. असा सज्जड दम ही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला. याचवेळी स्थानक परिसरातील स्वच्छता दुर्गंधी पाहून आगारप्रमुखांना फैलावर घेत, सचिवांना नोटीस काढण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची बोबडी वाळल्याचे बोलके चित्र यावेळी बसस्थानक परिसरात पाहायला मिळाले. 

 

स्वच्छतागृहाची केली पाहणी…

स्वच्छतागृहाची पाहणी करताना प्रवाशांकडून पैसे घेता मात्र सुविधा देत नाही. पैसे घेण्याचे आदेश नसताना तुम्ही पैसे कसे काय घेता? आत्ताच्या आत्ता यांचा मक्ता रद्द करा. प्रवाशांना सुविधा द्या. अशा सूचना देत विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आदेश दिले. 

 

प्रवाशांची संवाद साधत घेतला सेल्फी…

सोलापूर बसस्थानकावर असलेले कॅन्टीन प्रवाशांसाठी चांगले आहे का नाही? याची पाहणी परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली. कॅन्टींनच्या स्वयंपाक घरात जाऊन तेथील खाद्यपदार्थांची तपासणी केली. तसेच येथे सेवन करत असलेल्या खाद्यपदार्थांची प्रवाशांकडून माहिती घेतली. यावेळी काही प्रवाशांनी सेल्फी घेण्याची आग्रह केल्यानंतर त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. तर बस स्थानकावर उभे असलेल्या प्रवाशांना सेवेस संदर्भात प्रश्न विचारत माहिती घेतली. 

सोलापूर बस स्थानकाच्या गैरसोईबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने पाहणी दौऱ्यात संबंधितांना नोटीस…

सोलापूर बसस्थानकावर नेहमीच अस्वच्छता दुर्गंधी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतः तिसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर आलो आहे. तक्रारीच्या अनुषंगाने  परिसराची पाहणी केली. सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्थळ देखील अस्वच्छ आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. येत्या आठ दिवसात सोलापूर बसस्थानकाचे रूप बदलले पाहिजे. तसा आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. भरारी पथकाद्वारे पाहणी करण्यात येईल. बार्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बससेवा उपलब्ध होत नसल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आमची जबाबदारी आहे. त्यावर अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा डेली रिपोर्ट मागवला जाणार आहे. स्वच्छतेसंबंधी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे.

– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य 

 

महायुतीमध्ये सर्वकाही व्यवस्थित…

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, महायुतीमध्ये सर्वकाही व्यवस्थित आहे. काही गोष्टींमध्ये मतभेद व मनभेद असतात. परंतु त्या वरिष्ठ स्तरावरून हातळल्या जातील. भविष्यामध्ये महायुतीमध्ये कोणताही मिठाचा खडा येणार नाही. सामंजस्याची भूमिका घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल असे देखील प्रताप सरनाईक यांनी महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर सोलापूर दौऱ्यात स्पष्टीकरण दिले. 

 

बसस्थानक प्रमुखाची जबाबदारी मात्र ते आलेच नाहीत पुढे… 

सोलापूर बसस्थानक अपडेट ठेवण्याची जबाबदारी बसस्थानक प्रमुख जाधव यांची आहे. परंतु जाधव या तपासणी दौऱ्यात अधिकाऱ्यांच्या मागे दिसून आले. वास्तविक पाहता स्थानक परिसरात घडणाऱ्या घडामोडींवर बसस्थानक प्रमुखांचे नियंत्रण असते. चालक, वाहक, प्रवासी तसेच घडणाऱ्या घडामोडी यासाठी स्थानक प्रमुख जबाबदार असतो. परंतु मंत्र्यांच्या दौऱ्यात आगारप्रमुखांना हे प्रकरण चांगलेच शेकले आहे. तर दुसरीकडे बसस्थानक प्रमुख जाधव सेफ झाल्याचे दिसून आले. मात्र यावर स्थानिक पातळीवर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व इतर अधिकारी काय ॲक्शन घेणार याकडे मात्र एसटीतील इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फोटो ओळ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर बसस्थानक पाहणी दौऱ्यावर आल्यानंतर स्वच्छता आणि दुर्गंधी पाहून प्रत्येक विभागाची कसून तपासणी आणि चौकशी करताना अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

Post Views: 125
Previous Post

संविधान बचाव रॅलीचे ८५ वर्षाचे सुभान बनसोडे नेतृत्व 

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी तपपूर्तीनिमित्त तरुण भारतच्या विशेषांकासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी तपपूर्तीनिमित्त तरुण भारतच्या विशेषांकासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा

ताज्या बातम्या

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

अधिक मास जीवावर बेतला; गोदावरीत बुडून तिघींचा मृत्यू

June 15, 2026

सांगोला पोलिसांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

June 14, 2026

गोंदवले मसवड देवदर्शन करून येणाऱ्या पंढरपूरच्या भाविकांच्या पिकप ला अपघात पिकप विहिरीत पडून ८ जणांचा मृत्यू ७ जण जखमी  !

June 14, 2026

छोटा हत्ती विहीरीत पडुन  आठ जणांचा दुर्दैवी मृत्यु

June 14, 2026
प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

प्रतापसिंह मोहिते पाटील विकास सोसायटीची १०० टक्के कर्ज वसुली

June 14, 2026
योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

योगातून आरोग्याचा संदेश; राष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात जनजागृती रॅली

June 14, 2026
लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

लोकसहभागातून इंगळगी जिल्हा परिषद शाळेचा कायापालट!

June 14, 2026
श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान

June 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0910645

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697