मंगळवेढा – महिंद्रा कंपनीच्या बोलेरो गाडीत 3 जर्शी गायींना क्रुरपणाची वागणूक देवून त्यांची कत्तक करण्याच्या उद्देशाने घेवून जात असताना पोलीसांनी जनावरे बोलेरो वाहनासह 2 लाख 25 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन निलेश जालिंदर पवार (रा. जगतापवाडी जि.सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी सत्यजीत कळकुंबे (रा.कासेगाव पंढरपूर) हे दि.23 रोजी रात्री 2.15 वाजता मंगळवेढ्यातील हजारे पेट्रोल पंपासमोर असताना अमोल घाडगे व निलेश पवार या दोघा आरोपींनी त्यांच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो वाहन क्रमांक 09 ई.एम.9183 यामध्ये एकूण 3 जर्शी गायी दाटीवाटीने भरुन आखूड दोरीने बांधून क्रुरपणाची वागणूक देवून कत्तल करण्याच्या उद्देशाने घेवून जात असताना मिळून आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुनिता ताई चवरे ह्या कसोशीने करीत आहेत.

























