Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डिजिटल अरेस्ट ८.८० लाखांची फसवणूक;तीन जण अटकेत

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहिल्यानगर : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करून तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अहिल्यानगर सायबर पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली. ही कारवाई तांत्रिक तपासाच्या आधारे करण्यात आली.

सावेडी येथील संदिप हरिभाऊ कुलथे यांना २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल आले. कॉल करणाऱ्यांनी स्वतःला मुंबई सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे नाव मनी लॉन्ड्रिंग, हवाला मनी आणि आयडेंटिटी थेफ्ट प्रकरणात आल्याचा खोटा दावा करून डिजिटल अटक करण्याची धमकी देत फिर्यादींकडून ₹८,८०,००० रुपये ऑनलाइन वळवून घेतले.

या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३/२०२५ भा.दं.सं. ३१८(४), ३३६(३), ३४०(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान सायबर पोलीस पथकाने तांत्रिक माहिती, बँक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तीन आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पुणे आणि नगर जिल्ह्यात छापे टाकून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी विजय रंगनाथ चेमटे (रा. भाळवणी, ता. पारनेर, जि. अहमदनगर),
अभिजित अजिनाथ गिते (रा. दादेगाव, ता. आष्टी, सध्या नन्हे, पुणे),
अक्षय संजय तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासा, सध्या हिंजवडी, पुणे) या
 आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी व सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  सागर ढिकले, पो. उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, निळकंठ कारखेले, रावसाहेब हुसळे आणि अमोल आव्हाड यांनी केली आहे.

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने संशयास्पद लिंक, कॉल, OTP किंवा अनोळखी आर्थिक व्यवहारांवर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा १९४५ वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.

Post Views: 50
Previous Post

सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात भारतीय संविधान दिन साजरा

Next Post

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील

ताज्या बातम्या

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

May 18, 2026
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

May 18, 2026

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

सोलापूरचे महेंद्र गायकवाड देशाचे ३९ वे हिंदकेसरी #viral #solapurnews

May 18, 2026

पैसे लुटून चोरट्यानी दहिटणे गावच्या शेतात टाकले एटीएम मशीन #marathinews #solapurnews

May 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870013

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697