Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रामेश्वर मोहिते खून प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

तरुण भारतbyतरुण भारत
November 30, 2025
in marathwada
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – तालुक्यातील सांजा येथील रामेश्वर मोहिते यांचा धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात भर दुपारी दुचाकी बुलेट अंगावर घालून खाली पाडून धारदार शस्त्रांनी वार करुन दोन्ही हात व पाय शरीरा वेगळे करुन खून केला. या प्रकरणी न्यायालयामध्ये आरोपींचे वकील ॲड.अमोल वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदार यांचा जबाब यात आलेल्या विसंगती तसेच कायद्याच्या तरतुदी या सर्व बाबी आरोपींच्या वकिलांनी भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडल्यामुळे यातील सर्व आरोपींची मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता दि.२९ नोव्हेंबर रोजी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २६ एप्रिल २०२३ रोजी सांजा येथील रामेश्वर किसन मोहिते हे धाराशिव शहरातील सांजा रोडवरील भवानी चौकात रोडवर उभे होते. त्यावेळी आरोपी रणजीत सुभाष सुर्यवंशी, सागर रहमरी पडवळ, अक्षय रामहरी पडवळ, नारायण नागनाथ डोंगरे व चिवळादादा सुर्यवंशी यांनी मिळून रामेश्वर मोहिते यांच्या अंगावर दुचाकी बुलेट घालून त्यास खाली पाडले. तर रणजीत सुर्यवंशी व सागर रामहरी पडवळ यांनी रामेश्वर मोहितेच्या अंगावर कत्तीने हातावर व दोन्ही पायावर वार करून दोन्ही पाय व हात शरीरापासून वेगळे करून त्याचा खून केला. विशेष म्हणजे रामेश्वर मोहिते यास एक तासभर कोणीचीही मदत मिळू दिली नाही किंवा त्याच्या जवळ कोणालाही जाऊ दिले नाही.

या प्रकरणी रामहरीचा भाऊ पांडूरंग मोहिते यांनी वरील पाच आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वरील आरोपी विरुद्ध  कलम ३०२, १४९, १४७, १४८ अन्वये पाच  जनाविरुद्ध आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदकरण्यात आला.

 सदर गुन्ह्यावरून आनंदनगर पोलिसांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप पाटेकर यांनी तपास करुन पाच आरोपींना अटक करून त्या आरोपी विरोधात न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.  त्यात सुरुवातीपासून ॲड. अमोल वरुडकर यांनी काम पाहून यातील आरोपी अक्षय रामरी पडवळ, नारायण नागनाथ डोंगरे आणि काका चिवळादादा सुर्यवंशी यांना या गुन्ह्यातून अगोदरच बाहेर काढले होते. त्यानंतर रणजीत सुभाष सुर्यवंशी व सागर रामहरी पडवळ यांच्या विरोधात दोषारोपत्र दाखल झाले होते.

सदर गुन्ह्याचे दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर मे.न्यायालयात सुनावणी सुरू होऊन एकूण १३ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. यात कोणताही साक्षीदार व फिर्यादी देखील फितूर झालेले नव्हते. परंतू, आरोपीच्या वकिल ॲड.अमोल वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदार यांचा जबाब यामध्ये आलेल्या विसंगती आणि कायद्याच्या तरतुदी या सर्व बाबी आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे यातील आरोपी रणजीत सुभाष सूर्यवंशी व सागर रामवाडी पडवळ यांची मे.न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

यातील आरोपी सागर रामहरी पडवळ व रणजीत सुभाष सुर्यवंशी हे अडीच वर्षांपासून धाराशिव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात होते. या प्रकरणात सुरुवातीपासून ॲड.अमोल वरुडकर यांनी काम पाहिले होते. त्यानंतर आरोपी रंजीत सुभाष सुर्यवंशी यांच्यातर्फे ॲड. व्ही.पी. डोके यांनी व आरोपी सागर रामहरी पडवळ यांच्या तर्फे ॲड.अमोल वरुडकर यांनी काम पाहिले होते. त्यांना ॲड वैभव खांडेकर ॲड.किरण चादरे, ॲड.सचिन जाधव, ॲड.बालाजी पोतदार, ॲड.रजनीकांत ढेकणे, ॲड.जनक साळुंखे व ॲड.दीपक तुपसुंदरे यांनी काम पाहिले.

Post Views: 73
Previous Post

सर्वधर्मियांच्या विकासकामाची राष्ट्रवादीची हिच खरी रणनीती !

Next Post

उपशिक्षणाधिकारी पदी देवशाला शिंदे-गुंड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उपशिक्षणाधिकारी पदी देवशाला शिंदे-गुंड

ताज्या बातम्या

आरपीएफ जवानाने वाचवले प्राण

August 8, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा #solapurnews

August 8, 2026

एका सेकंदात घडला थरार

August 8, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Update

August 8, 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1036404

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!