Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लल्लाटी भंडारा उधळत; मल्हारी मार्तंडचा जयघोष !

तरुण भारतbyतरुण भारत
December 1, 2025
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सनातन वैदिक हिंदू धर्मातील महत्त्वाचा धार्मिक महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याकडे पाहिले जाते. या महिन्यात तीर्थक्षेत्र बाळे येथील श्री खंडोबा देवाची महिनाभर यात्रा भरते. यात्रेच्या पहिला रविवारी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील असंख्य भाविक श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात पहाटेपासूनच दाखल झाले होते. यावेळी भंडाऱ्याची उधळण करत मुखी “येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे ” असे म्हणत “पारंपारिक संबळाच्या तालावर मल्हारी मार्तंडचा एकच जयघोष करण्यात आला. 

     दरम्यान, श्रींचा गर्भगाभारा आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आला होता. यामुळे सर्वत्र नवचैतन्याचे आणि प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच पद्धतीने मंदिराच्या दर्शनी भागात फुलांच्या पाकळ्यांनी सजावट करण्यात आली होती. “बाळेगावचा राजा मल्हारी माझा”! या अक्षरात फुलांच्या पाकळ्यांनी सजावट केल्याने मंदिर परिसरात एक वेगळी शोभा निर्माण झाले होते. मंदिरात असंख्य भाविकांनी वारू सोडण्याचा कार्यक्रम संपन्न केला. अबालवृद्ध भाविकांना श्रींचे दर्शन घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेच्या माध्यमातून असंख्य भावीक दर्शन घेत असल्याचे दिसून येत आहे. 

   तत्पूर्वी दीपमाळेस तेल अर्पण केले. काही भाविकांनी नवस फेडण्याचा कार्यक्रम संपन्न केला. त्यामध्ये तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, लंगर तोडणे, अशा धार्मिक विधींचा समावेश होता. काही भाविकांनी लहान मुलांचे जावळ काढणे तसेच 

नवीन लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ करणे असे धार्मिक विधी देखील संपन्न केले. यात्रेच्या पहिल्या रविवारी भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सर्वत्र भाविकांची एकच गर्दी झाली होती. यात्रेच्या पहिल्या रविवारी सुमारे ४० हजाराहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची प्राथमिक माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.

चौकट 

सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मंदिर परिसरावर नजर

यात्रेच्या अनुषंगाने भाविकांची वाढणारे गर्दी लक्षात घेता मंदिर समिती आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मंदिर परिसरात  सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर ठेवण्यात आली आहे. श्रींच्या गर्भ गाभाऱ्यापासून ते मंदिराच्या दर्शनी भागापर्यंत प्रत्येक टप्प्याटप्प्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण २८ कॅमेऱ्याच्या माध्यमातून मंदिर परिसरावर नजर ठेवण्यात येत आहे. 

चौकट 

श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात चांदीचा मखर 

श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात सागवानी लाकडापासून मखर बनवण्यात आला आहे. त्या मखरावर चांदीचा लेप लावण्यात येणार आहे. यासाठी मंदिर समितीच्या वतीने असंख्य भाविक भक्तांना चांदी अर्पण करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

कोट

यात्रेच्या पहिल्या रविवारी मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी 

यात्रेच्या पहिल्या रविवारी पहाटे पाच वाजता काकडा आरती करण्यात आली. तदनंतर सकाळी आठ वाजता अभिषेक आणि महापूजा संध्याकाळी आठ वाजता महापूजा व पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर सायंकाळी नऊ वाजता अश्व आणि नंदीध्वजासह मंदिर प्रदक्षिणा धार्मिक विधी संपन्न झाले. यावेळी मानकरी पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे, यांना मानाचे वेडे देण्यात आले. मंदिराच्या सजावटीसाठी सुमारे ३०० किलो सुवासिक फुलांचा वापर करण्यात आला.

– सागर पुजारी, मंदिराचे पुजारी तथा मंदिर समिती सचिव 

Post Views: 104
Previous Post

जिजाऊ गुरुकुलचा ऐतिहासिक उपक्रम; दिल्ली अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान सोहळा

Next Post

संत नामदेवांचा पालखी सोहळा पंढरीत विसावला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत नामदेवांचा पालखी सोहळा पंढरीत विसावला

ताज्या बातम्या

भाजपात गेले राघव चढढा #marathinews #viral

April 25, 2026

तडीपार गुंडाने केली विद्यार्थ्याला मारहाण..

April 25, 2026

सोलापुरात ड्रग्स माफीयांचा पर्दाफाश

April 25, 2026
जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

April 25, 2026

तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याला ५ वर्षे प्रवेशबंदी

April 25, 2026

८३ पैकी ५२ बाल मातांचे वय १८ वर्षे

April 25, 2026

मुंबईसाठी मे महिन्यापासून केवळ दोन दिवस विमानसेवा

April 25, 2026

सोलापूर शहरात आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरु

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0829017

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697