माळशिरस – माळशिरसच्या समीर गांधी कला महाविद्यालयातील कु.तनिष्का काळे 49 किलो वजन गट प्रथम क्रमांक व कु. तेजस्विनी वाघमोडे 67 किलो वजन गट प्रथम कमांक यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो या उमा महाविद्यालय पंढरपूर येथे पार ।पडलेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यथ संपादन केले व त्यांची *फकीर मोहन युनिव्हर्सिटी उडीसा* येथे होणाऱ्या ऑल इंडिया नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या दोघींच्या यशाबद्दल श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्री. माधव काका मिराजदार, कार्याध्यक्ष ॲड. श्री. मिलिंद दादा कुलकर्णी, कार्यवाह श्री. रामभाऊ दोशी, सहकार्यवाहक श्री. ढाले सर, सर्व संचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच समीर गांधी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गेजगे सर व विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.अपर्णा इनामदार मॅडम. सर्व प्राध्यापक मंडळी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक प्रा.संजय सपताळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

























