धाराशिव – इटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धे मध्ये 17 वर्ष मुलीच्या गटातून धाराशिव ची संस्कृती कपाळे हिने कास्यपदक पटकाविले अशी माहिती धाराशिव जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव राजेश महाजन यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या स्कूल गेम्स गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने आयोजित इटानगर अरुणाचल प्रदेश येथे 69 व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये धाराशिव ची राज्य सुवर्णपदक विजेती खेळाडू संस्कृती कपाळे हिने १७ वर्ष मुलीच्या 32 किलो खालील वजनी गटातून खेळत छत्तीसगड, जम्मू काश्मीर, व अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूवर एकतर्फी मात करत कांस्यपदक पटकावले.
कांस्य पदक विजेती खेळाडू संस्कृती हिचे धाराशिव चे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री श्रीकांत हरनाळे , श्री भुजंगराव नाईकवाडी अक्षय बिराजदार, धाराशिव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जि. बी. कासराळे, सचिव राजेश महाजन, सहसचिव सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत ,रवी जाधव यांनी अभिनंदन केले.
विजेत्या खेळाडूंना राजेश महाजन, राम दराडे व माधव महाजन सुमेध चिलवंत स्मिता गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

















