सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला , कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागामध्ये YAPP इंडिया कंपनीकडून 40 संगणक आणि 8अँड्रॉईड डिजिटल बोर्ड भेट देण्यात आले.
YAPP इंडिया कंपनी पुणे यांच्याकडून दिनांक 8/12/25 रोजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेन हुआजू यांच्या उपस्थितीत भारतातील चीनचे महावाणिज्य दूत किन जी व त्यांच्या धर्मपत्नी मिस झुवेरीग यांच्या हस्ते संगणक कक्षाचे व अँड्रॉईड डिजिटल स्मार्ट बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कंपनीचे उपाध्यक्ष संतोष मादास व सेक्रेटरी मिसेस मोनिका गहलोत इत्यादी उपस्थित होते .
तसेच पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड्.श्रीनिवास क्यातम,उपाध्यक्ष प्रा.श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम व खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या प्रमुख उपस्थिती उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री मार्कंडेय महामुनी,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात ॲड श्रीनिवास क्यातम यांनी सर्वाचे स्वागत करून इ.5 वी ते 12 वी मधील गरीब व होतकरू विद्यार्थांना AI च्या जगाची ओळख करून देण्याकरिता संगणक कक्ष व ॲन्ड्राईड डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेकडून आभार व्यक्त करत आपल्या देणगीमुळे पुढील काळात आमचे विद्यार्थी चीनच्या AI जगात होणाऱ्या प्रगतीला हातभार लावतील अशी आशा व्यक्त केली.
आपल्या मनोगतात चीनचे महावाणिज्य दूत केन जी यांनी डॉक्टर कोटणीस हे मूळचे सोलापूरचे असल्याने चीन व सोलापूर शहरांचे जवळचे नाते असल्याचे सांगितले. डॉक्टर कोटणीस हे मानवतेचे पुजारी होते ,त्यांच्या मानवता दृष्टिकोनातून दोन्ही देशाचे संबंध वृद्धिंगत होत आहेत असे प्रतिपादन केले.
चेन हुआजू ( मुख्य कार्यकारी अधिकारी YAPP इंडिया ) हे बोलताना सदर साहित्य भारतातील मुलांना शिक्षणात तांत्रिकदृष्ट्या , मानसिक व बौद्धिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी दिले आहे. त्यांचा वापर करून मुलांचे डिजिटल सक्षमीकरण करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्याच्या दातृत्वाची आठवण रहावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुर्ला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक एक्कलदेवी सर यांचे सहकार्य लाभले .
याप्रसंगी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य , अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले ,पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू , प्रणिता सामल ,मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष पवार यांनी तर आभार प्रा श्रीनिवास कोंडी यांनी मानले.


















