बार्शी – ६ डिसेंबर १९९२ हिंदू शौर्य दिनानिमित्त बार्शी शहरामध्ये शनिवारी ६ रोजी रोजी हिंदू स्वाभिमान व पराक्रमाचा जागर करणेसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने शौर्य दिन महाआरती करण्यात आली.
यानिमित्त मंदिरांमध्ये सामूहिक आरती आणि अन्य उपक्रमांचे आयोजन केले होते. अयोध्या रामजन्मभूमी बंदीवासातून मुक्त करण्यासाठी ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनायेंगे’ हा संकल्प हिंदू समाजाने केला होता. ‘अखेर मंदिर वही बनायेंगे, मंदिर भव्य बनायेंगे।’ ही स्वप्नपूर्ती झाली, असे विहिंपचे विभाग सहमंत्री विजयकुमार पिसे यांनी सांगितले.
१९९२ मध्ये साडेपाचशे वर्षांचा बाबरी ढाँचा भुईसपाट करुन कलंक पुसून हिंदूंनी पराक्रम केला. स्वाभिमानाचा हा दिवस. शौर्य,पराक़्रमाचा दिवस. यानिमित्ताने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे बार्शी शहरात हनुमाननगर संकटमोचन मंदिरात विजयकुमार पिसे, जिल्हा सहमंत्री बापूसाहेब कदम, प्रखंड मंत्री अमर शुक्ला यांच्या हस्ते महाआरती झाली.
शत्रूला घुसकर मारेंगे। ही छत्रपती शिवरायांची नीती हिंदू समाजाने कायम लक्षात ठेवावी, जेणेकरुन कुणीही आपल्या नादाला येणार नाही, असा समर्थ आणि सामर्थ्यवान हिंदू समाज झाला पाहिजे, असे आवाहन पिसे यांनी युवकांना उद्देशून केले.
महाआरतीप्रसंगी उपस्थित अडीचशे तरुणांनी हिंदू जागर केला. दरम्यान महाआरतीनिमित्त बार्शी पोलिसांनी हनुमाननगर भागात रुट मार्च काढला होता.















