मंगळवेढा – भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,युनिट नं.3, लवंगी, या कारखान्याने चालु गळीत हंगाम 2025-26 मधील 15 नोव्हेंबर पर्यन्तचे ऊसाचे बिल प्रति मे. टन 2800 रु. प्रमाणे शेतकरी ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा केल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे संस्थापक,माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, आ.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 2025-26 च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकर्यांना पहिली उचल 2800 प्रती मे.टन ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. शेतकर्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्राम प्रमाणे आणला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊस पुरवठा कारखाण्यास करावा असे आवाहन भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी केले. तसेच एफआरपी पेक्षा जास्त दर आता पर्यन्त दिलेला आहे. शेतकर्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विेशासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल असे त्यांनी सांगितले.
अनिल सावंत म्हणाले की भैरवनाथ शुगरने सुरुवातीपासुन ऊस उत्पादकांशी असलेली बांधिलकी कायम ठेवत शेतकर्यांचे हित लक्षात घेता व दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम भैरवनाथ शुगर ने केले आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी भैरवनाथ शुगरला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.















