सोलापूर – शहर व कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा भैय्या चौक–मरीआई चौक–दादरा पूल पाडल्यानंतर, खमितकर अपार्टमेंट येथील एककमान पुलाखालून येणाऱ्या गाड्या आहेत. त्याठिकानाहून फक्त दुचाकी वाहन व स्कूल वाहतूक करणाऱ्या गाड्यांनाच परवानगी देण्यात यावी विद्यार्थी वेळेवर आपल्या शाळेत पोहोचतील अशी मागणी एकात्मता बहुउद्देशीय संथेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिराळकर यांनी निवेदनाद्वारे वाहतुक शाखेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एककमान हा वाहतुकीसाठी अत्यंत लहान पूल असून, वाहतुकीचा खोळंबा होणार नाही याची दक्षता प्रशासनांनी घ्यावी. चारचाकी वाहनांसाठी 54 मीटर रस्ता थेट पुणा नाका–संभाजी महाराज चौक मार्गे निघतो. त्यामुळे चारचाकी वाहनांना एककमानकडून जाण्या-येण्यास प्रतिबंध लावणे गरजेचे आहे.
खमितकर अपार्टमेंट व शेटे वास्तीजवळ वाहतूक शाखेचे दोन वाहतूक नियंत्रण पोलिस कर्मचारी येथे असणे गरजेचे असल्याचे निवेदन देताच तात्काळ वाहतूक नियंत्रण कक्षाचे पीआय रवींद्रनाथ भंडारे यांनी पाहणी केली आणि तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले.




















