सोलापूर : शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान केंद्राला शैक्षणिक अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान, प्रयोगांची ओळख आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन सौ. रोहिणी चौधरी मॅडम यांच्या पुढाकाराने करण्यात आले. विज्ञान केंद्रातील विविध प्रयोग, मॉडेल्स, अवकाशविषयक विभाग, तसेच प्रयोगशाळा पाहताना विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांना प्रश्न विचारून आपली जिज्ञासा पूर्ण केली.
उपक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. राजेश पटवर्धन सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका माळवतकर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे उपक्रम अधिक प्रभावी व यशस्वी ठरला.
























