सोलापूर – उत्कर्ष स्मृती चषक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात किरण स्पोर्ट्स क्लब व पुरुष गटात येथील किरण स्पोर्ट्स आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले
हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात किरण स्पोर्ट्सने वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबचा १०-९ असा १ गुण व ४.१० मिनिटे राखून पराभव केला. पुरुष गटात उत्कर्ष क्रीडा मंडळ व किरण स्पोर्ट्सने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु तांत्रिक कारणामुळे सामना झाला नसल्यामुळे दोघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले.
ही स्पर्धा सोलापूर सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन व उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्ष क्रीडा मंडळाचे गुरुवर्य शरणप्पा तोरवी, अनिल नागणे, रामचंद्र जाधव, विष्णुपंत अवताडे, मोहन किर्तक, गिरीष भोईटे, मोहन पवार, प्रमोद शिवपूजे व धीरज नगरकर या क्रीडा संघटक व खेळाडूंच्या स्मरणार्थ आयोजिली होती.
स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास पांढरे, अभियंता संतोष बायस, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, ज्येष्ठ खेळाडू विजय तडसरे व मनोज संगावार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, सचिव उमाकांत गायकवाड, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहखजिनदार सोमनाथ बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड, पंच मंडळ सचिव गोकुळ कांबळे, सदस्य सुरेश खुर्द भोसले, प्रा. डॉ. शिवानंद तोरवी, सोनाली केत, गुलाम मुजावर, रवींद्र नाशिककर, शरद व्हनकडे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत उत्कर्ष क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव अजित शिंदे, सिद्धाराम करजगीकर, आशिष अवधूर्ती, अनुप विभुते, सचिन हार, आनंद मठ्ठे, नानासाहेब पाटील, प्रभाकर माने, भुमन्ना शिरगिरे यांनी केले.
पंच म्हणून नागेश माडीकर, पुंडलिक कलखांबकर, किशोर गुंड, लखन कांबळे, नौशाद मुजावर, सुरज शेवाळे, आनंद जगताप व विजय अडगळे यांनी काम पाहिले.
















