Monday, November 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

क्रीडा भारती तर्फे क्रीडा ज्ञान परीक्षेतील पारितोषिक वितरण समारंभ

तरुण भारतbyतरुण भारत
December 24, 2025
in marathwada
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोमवार दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर येथे क्रीडा ज्ञान परीक्षे संदर्भातील दोन पारितोषिक  वितरण समारंभ व आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष प्रा शैलेश आपटे सर यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

यानिमित्ताने सकाळी ११ वाजता सोलापूर येथील शिवस्मारक समितीच्या सभागृहात, सोलापूर येथे क्रीडा भारतीचे वतीने सुरू असलेल्या १२ क्रीडा केंद्रप्रमुख प्रमुख आणि प्रशिक्षक यांचे सोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये फुटबॉल, कबड्डी, कुस्ती,लाठीकाठी अशा अनेक खेळांमध्ये एकूण बारा क्रीडा केंद्र चालविण्यात येतात. सर्व क्रीडा केंद्रांमध्ये मिळून जवळजवळ ४५० विद्यार्थी नियमित सराव करीत असतात. या बैठकीत प्रथम सर्व प्रशिक्षकांची त्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर त्यांच्या केंद्रावर सुरू असलेल्या ऍक्टिव्हिटी विषयी त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली.  शैलेश आपटे यांनी क्रीडा केंद्र कसे चालवावे, त्यात कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांना मार्गदर्शन केले. 

श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक

दुपारी १.३० वाजता श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी त्या महाविद्यालयातल्या ज्या विद्यार्थिनी क्रीडा ज्ञान परीक्षेला बसलेल्या होत्या त्या विद्यार्थिनींपैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थिनींना व महाविद्यालयाला स्मृतीचिन्ह देण्यासाठी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सुमारे दीडशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *प्राचार्य गजानन धरणे सर* उपस्थित होते. या महाविद्यालयातून सुमारे १५० विद्यार्थीनि यांनी या परीक्षेसाठी त्यांचा सहभाग नोंदविलेला होता. 

*श्री शैलेश आपटे* यांनी त्यांच्या निवेदनामध्ये क्रीडा भारती करीत असलेल्या क्रीडा क्षेत्रातील कार्याची माहिती उपस्थितांना दिली आणि पुढील वर्षी महाविद्यालयातील सर्व ११०० विद्यार्थिनींनी या परीक्षेसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले,आणि या आवाहनास  प्राचार्य धरणे सर यांनी त्यांच्या संभाषणात संमती देऊन पुढील वर्षी आमच्या सर्व विद्यार्थिनींना आम्ही या परीक्षेसाठी बसवू असं आश्वासित केले.

*एस इ एस पॉलीटेक्निक*

दुसरा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता एम इ एस पॉलीटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे *उपप्राचार्य पाटील* सर व संचालक मंडळातील सदस्य *श्री देवगावकर साहेब* हे उपस्थित होते. या महाविद्यालयातील *कुमारी ओवी शिंदे* यांनी क्रीडा ज्ञान परीक्षेतील तृतीय क्रमांकाचे *रुपये २५ हजार* चे पारितोषिक मिळवले होते. याचा पारितोषिक वितरण समारंभ या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आला. या समारंभासाठी देखील महाविद्यालयातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमांना सोलापूर क्रीडा भरतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सायंकाळी सहा वाजता सक्षम महिला अभियाना अंतर्गत लाठी काठी क्रीडा केंद्राचे उद्घाटन शिवस्मारक च्या क्रीडांगणावर प्राध्यापक शैलेश आपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या क्रीडा केंद्रावर एकूण ३५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी नोंदणी केलेली  आहे. वरील सर्व कार्यक्रमांसाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र चे मंत्री श्री ज्ञानेश्वर माकल व सोलापूर जिल्हा कार्यकारणीतील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 102
Previous Post

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: बार्शीचे ‘कोरेगाव’ आता झळकणार जागतिक पर्यटन नकाशावर

Next Post

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी अरुण कापसे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी अरुण कापसे

ताज्या बातम्या

टॉवेल व्यापाऱ्याची 40 लाखाची फसवणूक -मुंबईच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

जिल्ह्यातील शाळांचा दर्जा उंचवावा – सीईओं जैन 

November 1, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

November 1, 2026

जिल्ह्यातील ५० आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन; आता शाळांच्या गुणवत्तावाढीचे आव्हान!

November 1, 2026

एमपीएससीच्या अनागोंदीत तरुणांचे भविष्य अडकले; वय, पैसा आणि मानसिक स्वास्थ्याचा कस!

November 1, 2026
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे प्राचार्य वीरेश थळंगे यांना नेशन बिल्डर अवार्ड प्रदान

November 1, 2026

ऊस दरावरून राजू शेट्टी आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन, कारखानदारांना दर जाहीर करण्याचे आवाहन !

November 1, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाके मुक्त दिवाळीची शपथ

November 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1455177

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!