पंढरपूर – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश आनेचा यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री.जाधव यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार केला.
यावेळी मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
















