टेंभुर्णी – अकलूज नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष (श.प) पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचे शिलेदार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख यांच्या वतीने अकलूज येथे करण्यात आला.
अकलूज नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष (श.प) पक्षाने नगराध्यक्षपदासह 22 जागा जिंकून आणल्याबद्दल या विजयाचे मुख्य शिलेदार विजयसिंह मोहिते-पाटील, खा.धैर्यशील मोहिते-पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचा सत्कार तालुक्याचे नेते रावसाहेब नाना देशमुख यांच्या समवेत करण्यात आला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम,गोरख देशमुख,महादेव जगताप,ग्रामपंचायत सदस्य शैलेश ओहोळ,अप्पासाहेब हवलदार,यशपाल लोंढे,सुरेश देशमुख,अशोक वाघमारे,नागेश माळी,साहिल तांबे,विजय खरात,गणेश सरवदे,शारंग गायकवाड,समीर नाईकनवरे,बालाजी धुमाळ,स्वप्नील थोरात,रणजित अटकळे,श्रीधर भोसले,शिवाजी निचीते,समाधान जगताप,अशिष लोंढे,आकाश सुतार उपस्थित होते.


















