Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री सिद्धेश्वर महायात्रा नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार

तरुण भारतbyतरुण भारत
December 27, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ शांततेत, सुरक्षिततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक पूर्वतयारी व कृती आराखडा  तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा–२००५ अंतर्गत या महायात्रेसाठी घटना कमांडर (इन्सिडेंट कमांडर )म्हणून नियुक्ती केली आहे.महापालिकेतील उच्चस्तरीय समन्वय बैठकीत सर्व यंत्रणांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

          या अनुषंगाने आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील इंद्रभुवन येथे उच्चस्तरीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी,नगर अभियंता सारिका आकूलवार,महावितरण कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत माळपोरे, संदीप कोंडगुळे,आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी,  अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी

तपंन डंके, मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, सह.अभियंता विभागीय कार्यालय प्रकाश सावंत, अन्न व औषध प्रशासन अधिकारी पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिराडकर, शाखा अभियंता एम. एस. पवार,  विश्वस्त रतन रिक्के, बाळासाहेब भोगडे, प्रकाश बिराजदार, सुरेश म्हेत्रे कुंभार,कार्यकारी अभियंता अजयकुमार भोसले, वैद्यकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल डॉ.धनंजय गायकवाड, डीएमएमएस जिल्हाधिकारी कार्यालय अर्चना बिशोई,बीएसएनएलचे शेखर माळगे उपस्थित होते.

  बैठकीतील प्रमुख निर्णय, देवस्थान,

 यात्रा समितीची जबाबदारी :

यात्रा कालावधीत तसेच अक्षता सोहळ्याच्या दिवशी स्थानिक वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्राकाळात एलईडी स्क्रीन उभारणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, स्वतंत्र कंट्रोल रूम उभारणे, वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था करणे तसेच सर्व स्टॉलमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. देवस्थानच्या वतीने सगळीकडे मॅटिंग करणे व त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे त्याचबरोबर यात्रेच्या काळात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावणे. यात्रेच्या काळामध्ये तलावाच्या बाजूला बॅरिगेटीग करणे व सुरक्षारक्षक नेमणे,मनोरंजन नगरी येथील पाळणे उभे करण्यात येणार असून त्या ठिकाणी एक समिती नेमून स्ट्रक्चर स्टॅबिलिटी संपूर्ण माहिती घेणे, त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती महापालिकेला सादर करण्यात येणार आहे.

पोलीस विभागाची जबाबदारी 

अक्षता सोहळा व सर्व कार्यक्रमस्थळी गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, समन्वयक अधिकारी (सुपरवायझर) नेमणूक, बॅरिकेड्स लावणे, ‘नो पार्किंग झोन’ घोषित करणे व आपत्कालीन मार्गांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.

महापालिका प्रशासनाचे कामे अशी :

होम मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या मनोरंजन नगरीसाठी प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग तसेच आपत्कालीन प्रसंगी तात्काळ बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परिसराची नियमित स्वच्छता,  रोलिंग करणे, धूळ प्रदूषण टाळण्यासाठी दररोज पाणी मारणे, तसेच २४ तास कार्यरत कंट्रोल रूम, आपत्कालीन मदत कक्ष व प्रतिसाद केंद्र उभारण्यात येणार आहे. याठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची स्वच्छता, मार्गावरील झाडांच्या फांद्या, केबल वायर इत्यादी अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ :

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दिवसातून दोन वेळा पाणी मारणे, मॅटिंग व रोलिंग करणे, होम मैदानावर वाळू टाकणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात्रेदरम्यान दररोज तपासणी करून अहवाल मा. जिल्हाधिकारी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी व संबंधित कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. प्रदूषण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. धूळ प्रदूषण मोजण्यासाठी तीन ठिकाणी प्रदूषण मोजणी यंत्र बसवण्यात येणार आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभाग :

यात्राकाळात शहरातील व यात्रेतील सर्व हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सची दररोज तपासणी करण्यात येईल. भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होणार नाही याची खात्री केली जाईल व अन्नविषबाधा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येईल. सर्व अन्न विक्रेत्यांची पत्ता असलेली यादी देवस्थान व यात्रा समितीमार्फत संबंधित विभागास देण्यात येणार आहे. तात्पुरत्या दुकानांसाठी सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्याचे निर्देश देण्यात आले.

मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी बैठकीत सांगितले की, “महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाही श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ शांततेत, सुरक्षिततेने व भाविकांच्या सोयीसाठी पार पाडण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.”

श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध व वेळेत कामे पूर्ण करावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 74
Previous Post

ज्ञानेश्वर सपाटेंचा शिवसेनेत प्रवेश; धनुष्यबाणाने समोरच्यांचा छेद करू

Next Post

दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने दोन विद्यार्थीनिचा मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने दोन विद्यार्थीनिचा मृत्यू

ताज्या बातम्या

पेट्रोल डिझेल खर्चाचा फटका असाही #marathinews #news

June 4, 2026

मराठा आरक्षण मोठी अपडेट #viral #news #marathinews

June 4, 2026

पंकजा मुंढेचा सैराट अंदाज …… स्वतः चालवला ट्रॅक्टर #marathinews #news #viral

June 4, 2026

आता जागा झाला मणियार……. #marathinews #news

June 4, 2026

भारीच ….पाहिले आहे का असे स्वागत?? #viral #news #marathinews

June 4, 2026

महागात पडले वृक्षतोड हजारे पाटील यांना एक कोटी १८ लाखांचा दंड

June 4, 2026

*सावधान विचलीत करणारी दृष्य*नई जिंदगीत नाळही न कापलेल्या अवस्थेत आढळले पिशवीत नवजात अर्भक

June 4, 2026
नॅशनल स्पोर्ट्स ऑफ इंडियाच्या रन स्पर्धेत साईश्वर गुंटूक प्रथम

नॅशनल स्पोर्ट्स ऑफ इंडियाच्या रन स्पर्धेत साईश्वर गुंटूक प्रथम

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893062

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697