सोलापूर – माघवारी पालखीचा रिंगण सोहळा सोलापुरात यंदा 24 जानेवारीला होणार असून त्यासाठी लागणारी सर्व तयारी सुरु झाली आहे. भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा व चार गोल आणि एक उभे रिंगण केले जाणार आहे.
संघटनात्मक कौशल्य असल्यामुळे दोन्ही पालखी व सर्व दिंडी एकत्रित करून सोहळा सुरु केला आहे. या सर्व रिंगण सोहळ्यासाठी गणेश भंडारे यांच्या कडून आश्वाचा नियोजन बद्ध सराव सुरु केला आहे. सोलापूर शहर व परिसरातील दिंडी प्रमुख, वारकरी भाविकाचा खूप मोठा उत्साह दिसून येतो.
पहिले रिंगण नॉर्थकोट प्रशाला मैदान, सोलापूर येथे होणार असून या सोहळ्यात अश्व रिंगणाला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे रिंगणातील अश्व सराव खूपच गरजेचा आहे. त्यासाठी सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाने वारकरी प्रथेप्रमाणे रिंगण होण्यासाठी दोन्ही अश्व गजानन जगताप यांनी सज्ज करून मैदानामध्ये आणले आणि गोलाकार सराव करून घेतला.
या प्रसंगी बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव, संजय पवार शहर अध्यक्ष, किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष, पांडुरंग जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
















