Friday, September 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक च्या  वार्षिकांक “ सिद्ध २०२५” प्रकाशन व “सिद्धोत्सव २०२६”  चा उदघाटन सोहळा 

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक च्या  वार्षिकांक “ सिद्ध २०२५” या प्रकाशन व “सिद्धोत्सव २०२६”  चा उदघाटन सोहळा शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे उपाध्यक्ष श्री. सिद्धेश्वर बमणी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू मा. डॉ. श्री. इरेश स्वामी उपस्थित होते व देवस्थानाचे सचिव श्री. निळकंठप्पा कोणापुरे, देवस्थानाचे विश्वस्त श्री पशुपती माशाळ, श्री प्रभुराज मैंदर्गीकर  तसेच सिद्धेश्वर बालक मंदिरचे मुख्याध्यापक नागेश रायकोटी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली.

प्रमुख पाहुणे डॉ.श्री. इरेश स्वामी  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचा वार्षिक अंक हा विद्यार्थिनींमध्ये दडलेल्या भावना, विचार व अभिव्यक्ती शब्दरूपात मांडण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. मुली आपल्या वडिलांबद्दल किती संवेदनशील असतात याची सखोल अनुभूती या अंकातील लेखनातून मिळाल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. विविध कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना आपले विचार मांडण्याची संधी या अंकाच्या माध्यमातून मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळात हळूहळू लुप्त होत चाललेल्या लेखनशैलीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा वार्षिक अंकांची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. व्यक्तीमधील व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी व ते निखरण्यासाठी ‘सिद्ध’ अंकाचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. हा अंक विद्यार्थिनींची सर्जनशीलता, प्रतिभा आणि लेखनकौशल्य उजळून येण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. अंकाच्या ‘सिद्ध’ म्हणजेच परिपूर्ण या नावाप्रमाणे हा अंक अधिकाधिक यशस्वी ठरावा, यासाठी त्यांनी विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच लेखन करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

 वार्षिकांक सिद्ध २०२५ चे संपादक प्राध्यापक डॉ. श्रीशैल मळेवाडी यांनी यांनी प्रास्ताविक करून अंकाची ओळख करून दिली. या अंकामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश व कन्नड असे भाषेचे चार विभाग तसेच कला, क्रीडा, टेक्निकल असे तीन विभाग आहेत. मॅगझिन सेक्रेटरी मृणाल एकबोटे यांनी सांगितले की हा अंक नेतृत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हा फक्त अंक नसून विद्यार्थिनींनी केलेल्या कार्याचे एक आठवण पुस्तिका आहे.

महाविद्यलयाचे प्राचार्य गजानन धरणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा वार्षिक अंकाचा चौदावा अंक आहे. सिद्धोत्सव २०२६ विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की या उत्सवामध्ये सांस्कृतिक, तांत्रिक तसेच स्पोर्ट्स अशा विविध स्वरूपाच्या एकूण २४ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो आणि पुढील काळात तो अधिक वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

देवस्थान पंच कमिटी विश्वस्त पशुपती माशाळ यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांना असाच वाव मिळावा अशी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद मेणसे यांनी केले  व आभार प्रदर्शन अंकाचे संपादक श्रीशैल मळेवाडी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.स्वयंप्रकाश व्यास प्रा. मंदाकिनी आसबे, प्रा. प्रीती केशेट्टी प्रा.गायत्री लंगोटे, प्रा. रोहिणी जमादार, प्रा. भाग्यश्री पाटील प्रा.रचना दुरशेट्टी , प्रा.रविकिरण पतंगे यांनी परिश्रम घेतले. 

Post Views: 212
Previous Post

ज्याला आईबाप कळाले तो जग जिंकला – वसंत हंकारे 

Next Post

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई : डॉ. ओम्बासे मतदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई : डॉ. ओम्बासे मतदान

ताज्या बातम्या

पारंपारिक लेझीम रिंग टिपऱ्या आणि झांजसह निघाली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मिरवणूक#solapur #yesnews

September 24, 2026

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1254240

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!