अक्कलकोट – सोलापूर जनता सहकारी बँक अक्कलकोट शाखाचा ग्राहक स्नेह मेळावा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात मोठया उत्साहात पार पढला.
पहिल्यांदा भारतमाता प्रतिमेचं पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांचे परिचय संतोष वगाले यांनी करुन दिले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा सरकारी वकील ऍड. प्रदिपसिंग रजपूत व ता. संघचालक रविंद्र जोशी संपर्क संचालक जगदिश भुतडा सहाय्यक व्यवस्थापक रामदास सिध्दुल, माजी शाखाधिकारी विजयकुमार माळगे, प्रशासन अधिकारी नागेश गुणके, सुवर्णा साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.सोलापूर जनता बॅंक हि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी १९६३ साली सुरु केली. बॅंकेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.या साठ वर्षात खातेदार, हितचिंतकांचा अढळ विश्वास बॅंकेने संपादन केले आहे. त्यानिमित्त ग्राहक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आले होते.
बॅंकेचे विविध कर्ज योजना, ग्राहकांना दिल्या जाणा-या विविध सुविधा, व हिरक महोत्सव वर्षानिमित्त हिरक कर्ज योजना इ. ची माहिती शाखाधिकारी संकेत धारुरकर यांनी करुन दिली. संपर्क संचालक यांनी जनता बॅंकेच्या स्थापनेमागचा उद्देश, बॅंकेची सद्यस्थिती, व आगामी योजना इ. बद्दलची माहिती दिली. ग्राहकांच्या मनोगतात अभिजीत लोके सरांनी बॅंकेची तत्पर सेवा, ग्राहकांसोबत कर्मचा-यांचे सुसंवाद, ग्राहक सर्वतोपरी हि भावना संचालक व कर्मचा-यांची असल्याने बॅंकेची उत्तरोत्तर प्रगती होत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अक्कलकोट शहर व तालुक्यातील व्यापारी,नोकरदार वर्ग, हितचिंतक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवर, ग्राहकांचे आभार कनिष्ठ अधिकारी वर्षाराणी जंगम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरणप्पा भासगी,सायबण्णा सोनकांबळे, ऋषिकेश कोथिंबीरे,संदिप कटकधोंड यश कडगंची,महेश हळगोदे,राजेंद्र पवार, निलेश माळी यांनी परिश्रम घेतले.

















