मोहोळ – मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी अशोक पाचकुडवे यांचे तर सचिव म्हणून दादासाहेब गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मोहोळ तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक रविवारी दि. ४जानेवारी रोजी पार पडली.त्यात सर्वांमध्ये या निवडी करण्यात आल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष महेश सोवनी होते .
प्रारंभी वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यात आला त्यानंतर उपस्थित सदस्यांनी आपापली मते व्यक्त केली यानंतर ही निवडीचे प्रक्रिया पार पडली* . *नूतन कार्य कारिणी याप्रमाणे :-अध्यक्ष प्रा. अशोक पाचकुडवे (दै.जनमत ) उपाध्यक्ष -राम कांबळे , (दै. पुढारी ), सचिव -दादासाहेब गायकवाड (दै.नवराष्ट्र) आणि खजिनदार – सुभाष शिंदे (दै.संचार )*यानंतर नूतन अध्यक्ष अशोक पाचकुडवे यांनी आगामी काळात करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली* .
तर मावळते अध्यक्ष महेश सोवनी यांनी वर्षभरात सर्वात सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले* *यावेळी जेष्ठ पत्रकार दिलीप (काका) देशपांडे, राजकुमार शहा, अशोक कांबळे, महेश कुलकर्णी, संजय आठवले,देविदास नाईकनवरे, चंद्रकांत देवकते, भारत नाईक बालाजी शेळके, विष्णु शिंदे, सुहास घोडके, गो.रा.कुंभार, राजू शिंदे , सम्मेद शहा,आदि पत्रकार उपस्थित होते*.























