सोलापूर – ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने मोतीलाल राठोड यांना जिल्हाध्यक्ष करून बंजारा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासप्रिय व प्रामाणिक नेतृत्व दिला आहे . राठोड यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
मंद्रूप येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी आमदार देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष राठोड यांना समाजाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विकासापासून वंचित असणारा बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मोतीलाल राठोड यांनी आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व जिल्ह्यातील तांड्यांच्या सुधारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपाचे हणमंत कुलकर्णी, उपसरपंच भगवान व्हनमाने, गौरीशंकर मेंडगुदले, विश्वनाथ हिरेमठ, जितेंद्र गावडे, साहेबलाल हवालदार आदी उपस्थित होते.
























