सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक संदर्भात निवडणूक खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये राजकीय पक्षांचे उमेदवार, इच्छुक उमेदवार तसेच उमेदवारांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण बैठक घेण्यात आली.
मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी निवडणूक खर्चाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीस मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचारासाठी होणारा प्रत्येक खर्च नियमबद्ध, पारदर्शक व वेळेत नोंदवणे उमेदवारांसाठी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून ते दि. १६ जानेवारीपर्यंतचा संपूर्ण खर्चाचा तपशील निवडणूक खर्च समितीकडे सादर करावा. दि. ८ जानेवारी व १२ जानेवारी रोजी खर्च तपासणी होणार असून, त्या वेळी प्रचार खर्चाशी संबंधित बँक स्टेटमेंट व सर्व मूळ पावत्या सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिराती, सभा, वाहन वापर, बॅनर, पोस्टर तसेच सोशल मीडियावरील प्रचार खर्चाचीही नियमांनुसार नोंद करणे बंधनकारक आहे. खर्च सादरीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे, खर्च नोंदवही भरण्याची पद्धत व खर्च निरीक्षकांकडून होणाऱ्या तपासणीबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नियमबद्ध पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन
मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी केले आहे.
निवडणूक खर्चाबाबत महत्त्वाच्या सूचना
– अर्ज दाखल केल्यापासून १६ जानेवारीपर्यंतचा खर्च सादर करणे बंधनकारक
– दररोजचा प्रचार खर्च खर्च नोंदवहीत नोंदवावा
– ८ व १२ जानेवारी रोजी खर्च तपासणी
– बँक स्टेटमेंट व सर्व मूळ पावत्या अनिवार्य
– जाहिराती, सभा, वाहन, बॅनर, पोस्टर व सोशल मीडिया खर्चाची स्वतंत्र नोंद
– नियमभंग झाल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार

























