टेंभुर्णी – येथील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये व्यक्तिमत्व विकास, इंटरव्यू टेक्निक्स व रिझ्युम रायटिंग, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट या विषयावरती गौरीशंकर फार्मसी कॉलेज चे प्रोफेसर व्ही एन राजे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करायचा, निगेटिव्ह विचारापासून दूर कसे राहायचे, याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही हे पटवून दिले. इंटरव्यू ला जाताना रिझ्युम कसा तयार करावा, कोणते मुद्दे रिझ्युम मध्ये असावेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा वेळी आर्या कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉक्टर धनंजय चव्हाण, प्रा. तुषार कन्हेरे, प्रा. हर्षवर्धन वाघमारे,प्रा. संजीवनी कुटे, अमृता कसबे विजय शिंदे,आयेशा शेख व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्राध्यापक हर्षवर्धन वाघमारे यांनी काम पाहिले.

























