पंढरपूर – महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी प्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे नूतन वर्षे २०२६ च्या दिनदर्शिकेचे नुकतेच भव्य प्रकाशन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र राज्य संप्रदाय विभाग अध्यक्ष गिरीश आराध्ये तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे यांच्या अयोजनातून, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख (माऊली महाराज जळगावकर) यांच्या हस्ते दिनदर्शिका पांडुरंग चरणी अर्पण करून प्रकाशन करण्यात आले. यावेळी येथील नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री वरद कंस्ट्रक्शन प्रा.लि.चे बिल्डर व डेव्हलपर्स इंजिनिअर देवेंद्र (महेश) सांगोलकर, विजु काका कुलकर्णी (मुंढेवाडीकर), गिरीश आराध्ये, देवा तांबे, भारत चांडोले, रविंद्र चांडोले, सुधीर घोडके तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे असंख्य सेवेकरी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

























