सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय,श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा व मल्लिकार्जुन बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त प्रतिकात्मक नंदी ध्वज व पालखी मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी नंदी ध्वज व पालखीचे पूजन प्रमुख मानकरी मनोज हिरेहब्बू,जगदीश हिरेहब्बू,संजय हिरेहब्बू,विनोद हिरेहब्बू, मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे यांच्या शुभहस्ते माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे,संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ,वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले, सकाळचे कार्यकारी संपादक सिद्धाराम पाटील,उत्तर सोलापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार साहेब,केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे साहेब,प्र.मुख्या.रमेश दिंडोरे,बंडा प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी.बिराजदार, अक्कलकोट तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव सिद्धय्या स्वामी,सिध्देश्वर कल्लुरकर,लोकमतचे सहसंपादक रेवणसिद्ध जवळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर नगरातून बाराबंदीतील मुलांच्या हातात श्री सिद्धेश्वर यात्रेप्रमाणे सात प्रतिकात्मक नंदी ध्वज व पालखी,कावड,भगवे झेंडेधारी विद्यार्थी ‘ बोला बोला एकदा भक्त लिंग हर्र…बोला…हर्र…,श्री सिद्धेश्वर महाराज की जय ‘अशा घोषणा देत,बँजो,संबळ व ढोल ताशाच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत शेकडो बालचमू व शिक्षक वृंद बाराबंदी,नेहरू शर्ट या वेशभूषेत,तर मुली व शिक्षिका पारंपरिक साडीचोळी या वेशभूषेत दाग-दागिने घालून नटून-थटून सहभागी झाले होते.नंदी ध्वज,पालखीच्या स्वागतासाठी प्रशालेकडून व नगरवासीयाकडून रांगोळीच्या सुंदर,आकर्षक पायघड्या काढण्यात आल्या होत्या.मिरवणुकी दरम्यान हत्तुरे परिवार व भक्तगणाकडून नंदी ध्वजाचे स्वागत करण्यात आले.
टाळ पथक,ढोल पथक,धनगरी ढोल व कांतारा बाहुल्यांचे नृत्य मिरवणुकीचे खास आकर्षण होते ते पाहून नगरवासीय मंत्रमुग्ध झाले.यावेळी यात्रेसारखीच वातावरण निर्मिती झाल्याने हत्तुरे नगरवासीयांनी श्री सिद्धेश्वर यात्रेचा अनुभव घेतला.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.
या कार्यक्रमास प्राथ.मुख्या.सचिन जाधव,बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता हुमनाबादकर,बसवराज कोरे, अण्णाराया तुप्पद,भारत राऊत,काशिनाथ मळेवाडी,सुधाकर कामशेट्टी,विनायक हत्तुरे,रितेश हत्तुरे, सुनील घोळवे, मारुती माने,गिरमल पडसलगी,विरपाक्ष चिवरे,राजू बाहेरमठ व संकुलातील विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व नगरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके,गुरुसिद्धप्पा पाटील, विद्याधर हुलगेरी,दत्तात्रय अगरखेड,परमेश्वर चांदोडे,प्रा.लक्ष्मीकांत पनशेट्टी,प्रशांत हरके,विरेश हचडे,श्रीनिवास कोलप्याक,योगीनाथ शिरशी,गणेश कोरे,अमरनाथ कदारे,अनिता हौदे,संतोष हिरेमठ,महेश चिवरे,संतोष स्वामी,प्रतीक्षा बिडवे,प्रिया पसारे,सुनीता गंगोडा, रमेश आगवणे,अनिलकुमार गावडे यांनी परिश्रम घेतले.






















