Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे : डॉ. शेटे 

तरुण भारतbyतरुण भारत
January 7, 2026
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  वृत्तपत्रे ही माणसांचा श्वास अन् संजीवनी आहेत. पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. ज्यावेळी निराशजनक स्थिती वाटेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सकारात्मक दृष्टिकोन आठवावा. त्यामुळे जीवनात त्रास जाणवणार नाही, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी येथे केले.

       सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज शिवस्मारक सभागृहात पत्रकार दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा डॉ. शिवरत्न शेटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के  दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत जोशी, दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, दैनिक एकमतचे संपादक संजय येऊलकर, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनेल प्रमुख समाधान वाघमोडे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कव्हेकर, दशरथ वडतिले, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

        डॉ. शेटे पुढे म्हणाले, वृत्तपत्रांचा खप कमी अधिक होऊ शकतो पण ते कधीच संपणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. धकाधकीच्या जीवनात त्याकडे दुर्लक्ष होते. 

          संपादक सिद्धाराम पाटील यांनी कालची आणि आजची अत्याधुनिक पत्रकारिता यावर भाष्य केले. सद्यस्थितीत ए.आय. तंत्रज्ञान अधिक विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माध्यमांमध्ये मोठा बदल होणार आहे. ते बदल आता स्वीकारले पाहिजे, असे ते म्हणाले. 

         प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर संघाचे उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले.  याप्रसंगी विविध माध्यमांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.. तर राज्यकर्ते स्वैराचाराकडे

वळणार नाहीत : उमेश पाटील 

यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, पत्रकारितेतील सकारात्मक बदलाचा स्वीकार केला पाहिजे. आपण राजकारणात आलो नसतो तर निश्चितच पत्रकार झालो असतो. विद्यार्थी दशेपासून वृत्तपत्र वाचनाची सवय होती, त्याचा आजही उपयोग होत आहे. जशी प्रजा तसा राजा असे सांगतानाच प्रजेचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. पत्रकारितेचा चौथा स्तंभ सक्षम राहिला तर लोकशाही सक्षम राहील. त्यामुळे राज्यकर्ते स्वैराचाराकडे वळणार नाहीत. निवडणुका बिनविरोध व्हायला नको. या माध्यमातूनच हुकूमशाहीकडे वाटचाल होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यांचा झाला विशेष सन्मान 

ज्येष्ठ दिवंगत पत्रकार वि.शी. वस्त्रे यांची नात कु. सिद्धी वस्त्रे  यांची मोहोळच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आणि जीवनधारा अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत भरले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रति वर्षाप्रमाणे धोंडोपंत नृसिंह देशपांडे यांच्या स्मरणार्थ

 दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात प्रथम आलेल्या माधुरी शंकर नवले यांचा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. श्रावणी उमेश कदम हिच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक उमेश कदम यांच्याकडून श्लोक माधव येच्चे यास शैक्षणिक मदत देण्यात आली. 

Post Views: 45
Previous Post

उपसरपंच भिसे यांचा माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Next Post

महाप्रसादालय उभारत असून, याचे तळमजला स्ल्याब कॉक्रीट टाकण्याचा शुभारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महाप्रसादालय उभारत असून, याचे तळमजला स्ल्याब कॉक्रीट टाकण्याचा शुभारंभ

ताज्या बातम्या

अरुण रोडगे दोन वर्षाकरिता तडीपार. #public #marathinews #mh13newssolapur #tadipaar #crime

February 26, 2026

सोलापूरकरांनो गावाला जाताना सीसीटीव्ही आणि चॅनल लॉक ठेवाच. #public #marathinews #चोरी #robbery

February 26, 2026

अजित पवार अपघात प्रकरणी आ. रोहित पवार योगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात.#public #ajitpawar #viral

February 26, 2026

शिवसेनेच्या अल्पसंख्यांक नेत्यांची मुजोरी. #public #solapurnews #marathinews #maharashtranews

February 26, 2026

कोठेंनी अधिवेशनात मांडला सोलापूरकरांचा विषय. #public #marathinews #solapurnews #viral #solapurnews

February 26, 2026

पुण्यात वाहतूक वादात रूपाली ठोंबरे पाटील संतापल्या; #public #marathinews #rupalithombare #brknews

February 26, 2026

अखेर भिगवण ची तरुणी आईच्या घरी परतली. #viral #public #bhigwan #popular #brekingnews #news

February 26, 2026

पंढरीत चिमुकलीने केला रोजाचा उपवास 

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0706172

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697