पांगरी : प्रांतिक परिषद 10 मे 1924 रोजी.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.त्या मध्ये त्यांनी देशांतर , नामांतर की धर्मांतर हे विचार मांडले होते.त्या ऐतिहासिक घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने त्याचाच भाग म्हणून प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी व बुद्ध ,शाहू, फुले, आंबेडकर समविचारी संघटना बार्शी शहर तालुका व सोलापूर जिल्हा यांच्या वतीने बौद्ध धम्म परिषदेचे
प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट चे. श्रावस्ती बुद्ध विहार या ठिकाणी ट्रस्ट च्या मालकीच्या 41 गुट्टे जागेत भव्य बुध्द विहार निर्मिती चे काम चालू आहे. या ठिकाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद दोन सत्रात आयोजित केली होती .
पहिल्या सत्राचे उद्घाटन बार्शी तालुका आमदार दिलीप रावजी सोपल .तर दुसऱ्या सत्राचे उद्धघटन बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला भंते यश थेरो श्रीलंका, भंते करुणा नंद संभाजी नगर, भंते गुनानंद बुलढाणा, पूज्य भंते सुमित जी नागसेन खारोसा लातूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.प्राध्यापक रघुनाथ भोसले सोलापूर विद्यापीठ सोलापूर.
सेवानिवृत्त यांच्या धम्म दानातून साडेतीन लाख रुपये खर्च करून उभ्या केलेल्या अशोक स्तंभाचे लोकार्पण व या स्तंभाला महार रेजमेंट सोलापूर घटकांबळे यांच्या टीम ने सलामी देण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे,दत्ता गायवाड,डॉ कृष्णा मस्तुध,डॉ कमलाकर कांबळे , प्रशांत पैकेकर इत्यादी उपस्थित होते.या विहाराच्या जीर्णद्धारासाठी आमदार सोपल यांनी दहा लाख रुपये तर राजाभाऊ राऊत यांनी तीस लाख रुपये दिले आहेत.त्याच प्रमाणे सावळा शिंदे यांनी आपल्या आईच्या आठवणीत एक्वावन्नं हजार रुपये दिले आहेत. व भोजन दान दिले आहे.
ट्रस्ट च्या वतीने प्रमुख उपस्थितांचे सत्कर व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.परिषदेत मान्यवरांनी मांडलेली थोडक्यात मते आमदार सोपल डॉ बाबासाहेबनी देशाला संविधान तर दिलेच त्याच बरोबर जल संधारण कृषी व विद्युत क्षेत्रात ही अमुलाग्र अशे योगदान दिले . राजाभाऊ राऊत माजी आमदार यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुध्द विहार व्हावे असे सांगितले. योगीराज वाघमारे ज्येष्ठ साहत्यिक भावी पिढीला डॉ. बाबासाहेब सोलापूर जिह्यात किती वेळा आले याची माहिती व्हावी म्हणून पुस्तक लीहाले.
प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे बाबासाहेबांच्या चळवळीचा व क्रांती लढ्याचा विचार मांडला . भंते गुणा नंद महा थैरो श्रीलंका .डॉ बाबासाहेब यांनी विज्ञान वादी बुध्द धम्माची ओळख करून दिली . तोच धम्म संपूर्ण मानव जातीचे कल्याण करू शकते असे मत मांडले. भंते सुमित जी नागसेन यांच्या नेतृत्वाखाली सध्या टाकळी सिकंदर मोहोळ सोलापूर. तगर भूमी धाराशिव . खरोसा बुध्द भूमी लातूर . श्रवस्ती बुध्द विहार बार्शी या ठिकाणी बुध्द बिहारची कामे आंतीम टप्पायत आहेत.
बार्शी तालुक्यातील. गोरमळे, पांढरी , बार्शी तीन ठिकाणी धम्म धेशना देऊन त्यांच्या हस्ते बुद्ध मुर्त्याच्या प्रतिष्ठापना करण्यात आल्या. परिषदेचे प्रास्ताविक विष्णु कांबळे यांनी केले.आभार प्रा शशीकांत गायकवाड यांनी मांडले.



















