सोलापूर – मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त लक्ष्मी मार्केट येथे अभिवादन करण्यात आले.
जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजीमहाराज रयतेच राज्य निर्माण केले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण दिली म्हणूनच आजही शिवछत्रपतींच नाव जगभरात आहे, असे मत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांच्या हस्ते जिजाऊ पुजन करण्यात आल. जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, बशीर सय्यद ,तन्वीर गुलजार, रिजवान शेख, गफूर शेख, रिजवान दंडोती ,लक्ष्मण भोसले, रियाज पैलवान, सादिक शेख, मुख्तार लालकोट, सरफराज शेख, मौला शेख आदी उपस्थित होते.


















