सांगोला – तालुक्यातील डोंगरगाव येथे बुधवार दि.१४ जानेवारी रोजी पानिपत शौर्यदिनाच्या निमित्त भजन, समाधीस्थळावर पुष्पृष्टी व वक्ते सुनीलबापू लाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पानिपतच्या युद्धात शौर्य व वीरगती प्राप्त झालेल्या महिपतराव बाबर, लिंबाजी बाबर यांच्यासह या परिसरातील ८० वीरगती प्राप्त झालेल्या शूर योद्धांचा इतिहास आजरामर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपणही बाबरांच्या इतिहासाची शौर्यगाथा अभ्यासली पाहिजे. जीवनात आपल्या आयुष्याचे सोनं व्हावं असं जगलं पाहिजे. इतिहासातील मराठ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श जगापुढे आहे असे विचार सुनीलबापू लाड यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी सिद्धगोंडा पाटील, शिवाजीराव चालुक्य-साळुंखे, सुतार सर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमोद बाबर, माजी सैनिक रविकांत मराळ, बाळासाहेब कोकरे, अमोल बाबर, सतीश पाटील, दगडू बाबर, दिगंबर साळुंखे, सुभाष बाबर, माणिकराव बाबर, गजानन बाबर, युवराज बाबर, राजकुमार बाबर, शरद बाबर, महेश बाबर, केशव बाबर, सयाजी बाबर, विठ्ठल बाबर, विजय बाबर, दिपक बाबर, संकेत बाबर, शंभूराजे बाबर, श्री बाबर, जय बाबर, प्रताप बाबर, सुभाष बाबर, रणजीत बाबर, योगेश बाबर, शाम पवार, तानाजी बाबर, विजय भिंगे यांच्यासह विविध गावातील बाबर घराण्यातील वंशज, इतिहासप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रास्ताविक जगदीश बाबर यांनी केले. आभार विशालदीप बाबर यांनी मानले.


















