सोलापूर – राज्यस्तरीय प्रौढ गट टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरने विजेतेपद पटकाविले. यात मनीष रावत, आनंद कुलकर्णी, आत्माराम गांगर्डे व बसाब चौधरी यांचा समावेश आहे. तसेच वैयक्तिक ५० वर्षावरील गटात मनीष रावत यांनी अजिंक्यपद पटकावले. अन्य गटातील विजेत्यांमध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर व नागपूर येथील स्पर्धकांचा समावेश आहे.
विजापूर रोडवरील सुयश गुरुकुलमधील आत्मन क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत
पुरुष सांघिक गटात अंतिम सामन्यात ४० वर्षावरील गटात सोलापूरने मुंबई संघाचा 3-1 असा पराभव केला. त्याचबरोबर पुरुष एकेरीच्या सामन्यात मनीष रावत यांनी मुंबईच्या शरद ग्रोवर याचा 3-0 असा पराभव करून सुवर्ण पदक प्राप्त केले.
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती यतीन व सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस प्रौढ संघटनेचे अध्यक्ष राजीव व स्मिता बोडस, सुयश गुरुकुलचे संस्थापक विद्या केशव शिंदे, सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजू प्रधान आदी उपस्थित होते.
बक्षीस वितरणाचा महाराष्ट्र राज्य प्रौढ टेबल टेनिस संघटनेचे सेक्रेटरी जनरल यतीन टिपणीस यांच्या हस्ते झाले.
ही स्पर्धा प्रिसिजन कंपनी, बालाजी अमाईन्स व एनटीपीसी यांनी पुरस्कृत केली होती. यात राज्यातील पाचशे स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सोलापूर टेबल टेनिस असोसिएशनचे डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. नीलकंठ पोद्दार, अनंत कुलकर्णी, सुजित जवळेकर, डॉ. शशांक लिगाडे, प्रियदर्शन शहा, अलमेडा ऑबेरी, गोवर्धन, समीर शेख, झेड. एम. पुणेकर यांचे सहकार्य लाभले.
विविध गटाचे अंतिम निकाल : सांघिक : पुरुष : 60+ : टीम डीजी मुंबई विजयी विरुद्ध रॉक सॉलिड टीम मुंबई. महिला : सावेज गर्ल्स विजयी विरुद्ध साव्हेज ग्रुप.
एकेरी : महिला : 70+ : विना जोशी व नीता विजयी विरुद्ध मनीषा बोडस. 65+: रंजना पत्की विजयी विरुद्ध उज्वला मराठे. 60+: नीता कुलकर्णी विजयी विरुद्ध स्वाती आधारकर. 55+: शिल्पा जोशी विजयी विरुद्ध अनघा जोशी. 50+ : सुषमा मोगरे विजयी विरुद्ध मुनमुन मुखर्जी. 45+ : सौ राधिका डोरले विजयी विरुद्ध श्रुती जोशी.
40+ : सो मयुरी दीक्षित विजयी विरुद्ध प्रियांका घुमरे.
पुरुष : 80+ : सुबोध देशपांडे विजयी विरुद्ध सतीश शिरसाथी. 75+ : पिनायकीन संपत विजयी विरुद्ध दिलीप कुडतरकर. 70+ : शिवानंद कुंदा जे विजयी विरुद्ध योगेश देसाई.
65+ : जयंत कुलकर्णी विजयी विरुद्ध प्रकाश केळकर. 60+ : संजय जैन विजयी विरुद्ध अतुल देशमुख. 55+ : बसाब चौधरी विजयी विरुद्ध प्रसाद नाईक. 50+ : मनीष रावत विजयी विरुद्ध शरद ग्रोवर. 45+ : सुहास राणे विजयी विरुद्ध आदित्य गरडे. 40+ : संतोष वाकरळकर विजयी विरुद्ध अमोल सरोदे.
दुहेरी : अनिल रसाम व प्रशांत कसबे विजय विजयी पुरुषोत्तम मार्कड अँड माचवे.
60+ : गुरुचरण सिंग व नवीन सालियन विजयी विरुद्ध ओंकार जोग व दीपक कदम.



















