सोलापूर – मंद्रूप येथील श्री मळसिध्द देवस्थान पंच व यात्रा कमिटीचे अॅड. राजेश देशमुख यांचे आजोबा मानाजीराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री मळसिध्द देवाच्या यात्रेनिमित्त श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्याकडून श्री मळसिध्द व मल्लिकार्जून कुस्ती आखाडा येथे मल्लांच्या जंगी कुस्त्या पार पडल्या.
या कुस्ती फडाचे पूजन अरकेरी मठाचे मठाधिपती औदुसिध्द महाराज व गदगी पुजारी गेनप्पा पुजारी यांच्या हस्ते व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, भाजपाचे मळसिध्द मुगळे, माजी उपसरपंच रमेश नवले, संतोष शेडजी , माजी सभापती प्रशांत कडते आदींची उपस्थिती होती. यावेळी मंद्रूप व परीसरातील मल्लांसाठी तीन लाखांपर्यंत कुस्ती लावण्यात आले.
यावेळी सुरेश पाटील, सुरेश टेळे, शिवपुत्र जोडमोटे, गौरीशंकर मेंडगुदले, चंदु देशमुख, रेवणसिध्द मेंडगुदले, सुरेश टेळे, तमण्णा पुजारी, मळसिध्द पुजारी, बाबूशा देशमुख, बाळासाहेब देशमुख, सोमनिंग पुजारी, धानेश शेख, सिध्दलिंग म्हेत्रे, दयानंद ख्याडे, श्रीमंत रूपनर, संतोष बरूरे, राजकुमार व्हनमाने, चिदानंद मुगळे, नितीन टेळे, सुनिल व्हनमाने, सुरेश देशमुख, शिवानंद लोभे, अविनाश देशमुख, जगनाथ म्हेत्रे, भीमाशंकर देशमुख, अनिकेत पाटील, महादेव जकुणे, विठ्ठल बंडगर, राजकुमार हेसे, सोनु नवले, विठ्ठल जोडमोटे, अप्पू शिळ्ळे, म्हाळप्पा व्हनमाने , बाबूलाल लिगेवान, मुबारक मोमीन, बुडन शेख, मिरा लिगेवान, अजय देशमुख, अमृत चव्हाण, मोतीराम चव्हाण, प्रविण कुंभार, अमोगसिध्द वाघमोडे, प्रकाश नवले , दादा साठे आदी उपस्थित होते.
























