बदनापूर – यशाची परंपरा कायम राखून याही वर्षी चैतन्य सुधीर दिंडे याने विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी त्याने उत्कृष्ट यश संपादन करत दुसर्या टप्प्यासाठी पात्रता मिळवली आहे.
होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा ही इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या परीक्षेमध्ये गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात तसेच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक कौशल्येही तपासली जातात. निवडक विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात सहभागी होण्याची संधी दिली जाते. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चैतन्य दिंडे याने यश संपादन करून प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. बालवयात त्याने असे यश
मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. चैतन्य हा बदनापूर येथील ‘पाथ्रीकर कॅम्पस’ येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील लोकप्रशासन
विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर दिंडे यांचा चिरंजीव आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्यावतीने विशेष
कौतुक करण्यात आले.कुटुंबीय, शिक्षक, नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



















