Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मांगी तलावातून 20% पाणी नेण्याचा घाट; लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा –  तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून हळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी विद्यालयासाठी सिंचन व पिण्याकरिता मांगी तलावातील पाणी आरक्षित करण्याच्या निर्णयावर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात मांगी तलाव संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला असून, येत्या काळात गावोगावी जनजागृती करून हजारो शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून गावोगावी बैठका घेण्यात येत असून दि. १४ जानेवारी रोजी वडगाव दक्षिण येथील महादेव मंदिर, दि. १५ जानेवारी रोजी मांगी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात तर दि. १६ जानेवारी रोजी वडगाव उत्तर येथिल हनुमान मंदिरात मांगी तलाव संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. या बैठकीस सर्वपक्षीय ग्रामस्थ, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. राम शिंदे यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

मांगी तलावाची निर्मिती १९५० च्या दशकात करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी शेती व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून करण्यात आली होती. या तलावामुळे मांगीसह पंचक्रोशीतील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली असून, अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. मात्र हा तलाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पर्जन्यमान चांगले असेल तरच तलाव भरतो; अन्यथा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

४० तलावाची साठवण क्षमता १ टीएमसी असली तरी सध्या २० टक्के गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात भरलेला तलाव दोन-तीन महिन्यांतच टक्क्यांपर्यंत खाली येतो. त्यामुळे उन्हाळ्यात तलाव लाभक्षेत्रातील पुनवर, वडगाव उत्तर, वडगाव दक्षिण, मांगी, जातेगाव, हिवरवाडी, रावगाव, भोसे, राखवाडी, लिंबेवाडी, पोथरे, निलज, खांबेवाडी, धायखिंडी यांच्यासह वाड्या-वस्त्या तसेच बोरगाव सिंचन योजनेतील बारा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

अनेक वर्षांपासून मांगी तलावाला कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. मात्र काही अपवाद वगळता गेल्या चार दशकांत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलली नाहीत. अशा परिस्थितीत पाणीटंचाईचा विचार न करता तलावातील पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून हा निर्णय मागे न घेतल्यास मांगी व तलाव लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी व ग्रामस्थ आपल्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, उपसरपंच नवनाथ बागल, पत्रकार प्रवीण अवचर, अभिजीत वाघमोडे, विकास गायकवाड, उमेश बागल, अभिमान अवचर, संतोष नरसाळे, सुधाकर नरसाळे, राहुल जाधव, किरण बागल, बापू वाडेकर, दिवाण बागल, निळकंठ बागल, प्रताप बागल, महादेव अवचर, दिगंबर बागल,  बाळासाहेब नलावडे, राजाभाऊ क्षीरसागर, मेजर चंद्रकांत बागल, अनिल बागल, निखिल बागल, संभाजीराजे बागल यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Post Views: 26
Previous Post

प्रितमसिंह देवकाते पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात

Next Post

कुसमोड येथील अनेकांचा माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कुसमोड येथील अनेकांचा माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

शेळ्या चोरीचे 18 गुन्हे करणारी टोळी जेरबंद

February 27, 2026

खंदक बागेत अचानक लागली आग.. #solapurnews #solapur #popular #mh13newssolapur

February 26, 2026

NMMS परीक्षेत लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयाचे यश..#public #school #students #viral

February 26, 2026

रामभाऊ जोशी हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश #public #viral #tranding #school

February 26, 2026

अतिरिक्त उत्खननाचा ग्रामस्थांचा आरोप..#public #viral

February 26, 2026

पत्रकार सचिन शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा.. #public #marathinews #viral

February 26, 2026

रामनवमी 2026 ची नियोजन बैठक संपन्न. #public #ramnavmi #tranding #ram #ramrajya #jayshreeram

February 26, 2026

सोयगाव येथे आई महोत्सावा निमित्त जि.परिषद केंद्र प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0707168

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697