करकंब : आव्हे ता.पंढरपूर येथील काही ऊसतोड मजुरांना अटकाव करून डांबून ठेवल्याची माहिती सोलापूर नियंत्रण कशाला मिळाली होती.त्याअनुषंगाने करकंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आव्हे येथील १० ऊसतोड मजुरांची सुटका केली.याबाबत सविस्तर माहिती अशीकी आव्हे ता.पंढरपूर येथील नितीन पोपट बनसोडे,पोपट बनसोडे दोघे रा.आव्हे, ता.पंढरपुर यांचे शेतात ऊसतोड मजुर अटकाव करून डांबुन ठेवलेबाबत नियत्रंण कक्ष सोलापुर ग्रामीण यांचेकडुन माहीती मिळाल्याने प्रभारी अधिकारी सपोनि योगेश लंगुटे यांनी तात्काळ सदर घटनेबाबत गोपनिय माहीती काढुन करकंब पोलीस कर्मचाऱ्यांना माहीतीच्या ठिकाणी पाठविले असता सदर ठिकाणी पोलीसांनी नितीन पोपट बनसोडे,पोपट बनसोडे यांचे घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये मागील २महिन्यापासुन त्यांचेकडून दिवसा ऊसतोड करून घेवुन रात्री या मजुरांना पत्राशेडमध्ये कुलुप लावुन डांबुन ठेवत होते.त्या १०ऊसतोड मजुरांची पोलिसांच्या मदतीने सुटका करण्यातआली.सदर ऊसतोड मजुरांना अटकाव करून ठेवलेल्या नितीन पोपट बनसोडे,पोपटू बनसोडे यांचेविरूध्द गडाप्पा शिवाप्पा सालुटगी रा.भुयार ता.इंडी जि. विजापुर राज्य कर्नाटक यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबावरून करकंब पोलीस ठाणे गु.र.नं.१०/२०२६,भा.न्या.सं. २०२३चे कलम १२७ (४),११५(२),३५१ (२),३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेडकॉ असिफ आतार हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,सहाय्यक पोलीस अधिक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर प्रशांत डगळे यांचे मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड,पोहेकॉ तानाजी धिमधिमे, पोहेकॉ बापूसाहेब मोरे,पोहेकॉ आसिफआतार,पोना मेहबूब इनामदार,पोना भोसले,पोकॉ निखिल काळे,पोकों महेश बोंगाणे यांनी पार पाडली.



















