Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी पक्षातीलच गद्दारी! गंभीर आरोप

तरुण भारतbyतरुण भारत
January 19, 2026
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – जालना शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेस पक्षातीलच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सक्षम उमेदवारांना पाडण्यासाठी थेट कारस्थाने रचल्याचा खळबळजनक आरोप शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विनोदभैय्या यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. पक्षाच्या नावाखालीच उमेदवारांचे मनोबल खच्चीकरण, आर्थिक अडवणूक व विरोधकांशी संगनमत करून निवडणूक बिघडवण्याचा घाणेरडा प्रकार उघडकीस आल्याने शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

या संपूर्ण षड्यंत्रास काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, कल्याण दळे, अब्दुल रशीद पहलवान, अतीक खान तसेच प्रदेश पदाधिकारी सतीश गणेश पाटील हे थेट जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विनोदभैय्या यादव यांनी केला.

 सक्षम उमेदवारांना संपवण्याचा डाव

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार निवडताना जाणीवपूर्वक सक्षम उमेदवारांना डावलण्यात आले. उमेदवारांना पक्षाकडून कोणतीही मदत न देता उलट त्रास देण्यात आला. अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेसमोर जाणूनबुजून कमकुवत उमेदवार देऊन काँग्रेसचीच शिवसेना ‘बी टीम’ म्हणून काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

 प्रभाग क्रमांक ०२ ब मध्ये उघड कारस्थान

प्रभाग क्रमांक ०२ ब मधील काँग्रेस उमेदवार जागृती बलीराम यादव यांनी सांगितले की, त्यांचे नाव खासदार डॉ. कल्याण काळे यांनी तयार केलेल्या अंतिम उमेदवार यादीत होते. मात्र मेरीट हॉटेलमध्ये अचानक यादी बदलण्यात आली. हा बदल कोणी, कधी व का केला याचे उत्तर आजही मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 बी-फॉर्मसाठी टाळाटाळ, वेळकाढूपणा

उमेदवारी अर्जासोबत बी-फॉर्म जोडण्यासाठी वेळेआधी प्रयत्न करूनही जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत वेळ वाया घालवली. अखेर विनोद यादव यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात हात पकडून नेत गर्दीतून मार्ग काढत कसाबसा बी-फॉर्म जोडल्याचा थरारक प्रकार घडला.

छाननीत नाव बदलण्याचा प्रयत्न

छाननीच्या दिवशी प्रदेश पदाधिकारी सतीश गणेश पाटील यांच्या नावाने आलेल्या पत्रात जागृती यादव यांचे नाव वगळून दुसऱ्या उमेदवाराचे नाव असल्याचे सांगण्यात आले. यावर सुनावणी झाली. अखेर संध्याकाळी आठ वाजता “पहिला अर्ज दाखल झाल्याने जागृती यादव यांचा अर्ज वैध” असा निर्णय देण्यात आला.

 पैसे वाटून विरोध उभा केल्याचा आरोप

यानंतर अपक्ष उमेदवार उभे करून त्यांना आर्थिक बळ देण्यात आले. कधी काँग्रेस, कधी कमळ, तर कधी शिवसेना चालवा असे सांगत खुलेआम पैसे वाटप करून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा सारा प्रकार काँग्रेसमधीलच शिवसेना ‘बी टीम’ने रचल्याचा आरोप विनोदभैय्या यादव यांनी केला.

काँग्रेसला जय श्रीराम; भाजपात प्रवेश लवकरच

या साऱ्या गद्दारी, फसवणूक आणि कारस्थानांमुळे काँग्रेस पक्षावरचा विश्वास संपल्याचे सांगत विनोदभैय्या यादव व जागृती बलीराम यादव यांनी काँग्रेस पक्षाला जय श्रीराम केला. लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला विनोदभैय्या यादव, जागृती बलीराम यादव, सौ. सुनंदा चरपटे, अभयकुमार यादव यांच्यासह असंख्य संतप्त कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 42
Previous Post

फुटीच्या भीतीने नाहीतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी एकत्र जमवले : एकनाथ शिंदे

Next Post

पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दरोड्यातील आरोपी जेरबंद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दरोड्यातील आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

April 26, 2026
‘किंगमेकर’ आता विधीमंडळात धडकणार? चंद्रकांतदादांनी दिलेलं ‘ते’ घड्याळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातातील ‘गिफ्ट’

‘किंगमेकर’ आता विधीमंडळात धडकणार? चंद्रकांतदादांनी दिलेलं ‘ते’ घड्याळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातातील ‘गिफ्ट’

April 26, 2026
न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

April 26, 2026
रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

April 26, 2026

मंठा येथील कृषी सेवा केंद्र चालकांचा बेमुदत बंद आंदोलन

April 25, 2026

पारध येथे मानव एकता दिनी भव्य सत्संग

April 25, 2026

खरीप हंगाम पूर्व भाजीपाला रोपवाटिकांची कृषी विभागाच्या वतीने तपासणी

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0830081

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697