बार्शी – छावा प्रतिष्ठान यांच्याकडून बार्शी शहरातील व तालुक्यातील ज्या संस्था छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करीत आहेत अशा संस्थेचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तहसीलदार एफ.आर. शेख, बार्शी तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, डॉ. सचिन मांजरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्ध अभिषेक, जल अभिषेक व पुष्पमाला अर्पण करुन संभाजीराजांच्या जयघोषात व तोफांची सलामी देऊन संपन्न झाला.
यावेळी सर्व मान्यवरांचा व विविध संघटनेमधून छत्रपती संभाजी महाराज यांचे काम करणाऱ्याचा सन्मान करण्यात आला. ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचा सन्मान संस्थेचे खजिनदार मानकोजी ताकभाते यांनी सर्वांच्यावतीने हा सन्मान स्वीकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते, सुनील फल्ले हे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी छावा प्रतिष्ठानचे सुभाष तुपे, उपाध्यक्ष आकाश चव्हाण, सचिव शुभम चव्हाण व इतर सर्व शिवशंभोप्रेमी यांनी जो सन्मान केला त्याबद्दल राहुल वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.
















