माढा : सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी कै. गणपतराव साठे यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त माढ्यात स्वराज्य ग्रुपच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा प्रणितीताई भालके, कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे व माढा नगरपंचायत नगराध्यक्षा मीनलताई साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी दादासाहेब साठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर ,नगरसेविका भाग्यश्री पाटील,साक्षी डिकोळे नगरसेवविका मोहिनी नेटके,शबाना बागवान, सुनीता राऊत,शहाजी साठे, गुरुराज कानडे, मुन्ना साठे,उमेश साठे, वेदांत साठे, समर्थ भांगे, राजू गोटे, नाना साठे, सचिन साबळे,शिवाजी जगदाळे, नितीन ताना साठे, औदुंबर वाकवकर आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर खेळवली जात असून माजी नगरसेवक नितीन ताना साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य ग्रुपने याचे आयोजन केले आहे.
















