Thursday, February 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कासारवाडीत एनएसएस शिबिरात ‘जल, जंगल आणि जमीन संवर्धन’वर प्रेरणादायी व्याख्यान

तरुण भारतbyतरुण भारत
January 20, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ‘जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन ही काळाची गरज’ या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले.

हे शिबीर ‘शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका : जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास’ या महत्त्वपूर्ण विषयावर दि. १७ ते २३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, दि. १८ जानेवारी रोजी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. आनंद कसबे (मुख्याध्यापक, संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पानगाव) यांनी स्वयंसेवकांना मौलिक मार्गदर्शन केले.

आपल्या प्रभावी भाषणात श्री. कसबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण देत सांगितले की, आरमार उभारणीसाठी सुद्धा त्यांनी पर्यावरणाचा समतोल बिघडू दिला नाही. आपल्या परिसरातील आंब्याची झाडे तोडू नयेत, जंगल संपत्तीचे जतन व्हावे आणि जमिनीचा सुयोग्य वापर व्हावा, यासाठी त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध धोरण अवलंबले होते. आजच्या पिढीनेही त्याच विचारांची प्रेरणा घेऊन पाणी, झाडे व जमीन यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढ्यांसाठीची जबाबदारी असल्याची भावना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. साक्षी धुमाळ हिने केले. तिने जल, जंगल व जमीन यांच्या संवर्धनाचे महत्त्व विशद करत शिबिरामागील भूमिका मांडली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. यश कोळी याने करुन दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगणक विभाग प्रमुख प्रा. बी. व्ही. लिंगे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, ‘विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून गावात जाऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून पोहोचवावा,’ असे आवाहन केले.

या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, प्रा. एस. एम. भांबीरे, प्राध्यापिका एम. पी. शिंदे तसेच सुमारे १०० स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लक्ष्मी शर्मा हिने अत्यंत संयोजित व प्रभावी पद्धतीने केले तर आभार कु. अमृता राऊत हिने मानले.

Post Views: 52
Previous Post

युवानेते नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी केले बालचमूंचे कौतुक

Next Post

पोदार लर्न स्कूल, बार्शी येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पोदार लर्न स्कूल, बार्शी येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

ताज्या बातम्या

काँग्रेस प्रवक्ते हणुमंत पवार यांना मारहाण

February 26, 2026

जि.प.प्रा.शाळा जळोलीच्या सात विद्यार्थीनीनींचे एनएमएमएस परीक्षेत सुयश

February 26, 2026

सुमन चंद्रशेखर यांना यशदा, पुणे या संस्थेचा ग्रंथ साहित्य पुरस्कार

February 26, 2026

निमा सोलापूर आयोजित “ट्रायअसोसिएशन कप”क्रिकेट स्पर्धेची सुरुवात

February 26, 2026

सृजनरंग स्पर्धेत दयानंदचे यश

February 26, 2026

महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश

February 26, 2026

शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये लेखक आपल्या भेटीला’

February 26, 2026

नियतकालिक स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयास तिसरे पारितोषिक

February 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0704833

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697