सोलापूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांच्या सूचनेनुसार ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इकबाल तडकल यांनी सोमपा अतिरिक्त आयुक्त पवार यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात घनकचरा व्यवस्थापन विभागातील बडतर्फ करण्यात आलेल्या १५ कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत रुजू करून घ्यावे, तसेच आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्वातंत्र्यदिनी दिलेल्या आश्वासनानुसार कायम, बदली रोजंदारी, मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कॅशलेस विमा योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.यासह पदोन्नतीवर जमादारपदी नियुक्त झालेल्या महिला व बिगारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती नको असल्यास कोणतेही नुकसान न करता मूळ पदावरच कायम ठेवावे, या मागण्यांचा समावेश आहे.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी खजिनदार अरुण मेहेत्रे, राम चंदनशिवे, दिनेश बनसोडे, सुनील शिंदे, संतोष गायकवाड, महेश खोडके, राहुल गायकवाड, अतुल जाधव यांच्यासह ट्रेड युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















