सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २ हजार ४५५ जणांनी रक्तदान केले. याशिबिराला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक मेघनाथ येमूल, प्रथमेश कोठे, डॉ. अजय पोन्नम, विनायक कोंड्याल, दीपिका यलदंडी, कविता गज्जम, विजय चिप्पा,व्यंकटेश कोंडी, शेखर इगे, सिद्धेश्वर कमटम,सतीश सिरशिल्ला, प्रशांत पल्ली, उज्वला दासरी ,स्वाती बडगु, सुनीता कामाठी, युवराज सरवदे, डॉ. माणिक गुर्रम ,रमेश विडप, नागेश वल्याळ, दयानंद कोंडाबत्तीनी, अमृतदत्त चिन्नी, अशोक इंदापूरे, हरिदास पोटाबत्ती, अजय अन्नलदास ,संतोष सोमा, श्रीनिवास गड्डम ,पत्रकार श्रीनिवास दासरी, वेणुगोपाळ गाडी, मिलिंद कुलकर्णी ,दीपक सोमा, श्रीनिवास गाजूल, पेंटप्पा गड्डम विश्वस्त पांडुरंग दिड्डी ,श्रीधर चिट्याल, नागनाथ गंजी, विजयकुमार गुल्लापल्ली, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा ,प्रभाकर आरकाल, गणेश गुज्जा, श्रीनिवास जोग, संगीता इंदापूरे, नागनाथ गंजी, हरीष कोंडा, श्रीनिवास गड्डम, नरेश श्रीरामदास, रामदास इप्पाकायल, अंबादास गज्जम ,अरविंद कुचन , श्रीनिवास इप्पाकायल, निलेश सरगम, यशवंत इंदापुरे आदीची उपस्थिती होती.
मार्कंडेय जन्मोत्सव संस्थेच्या सर्व शाखा एकत्रितपणे कुचन प्रशालेत साजरा करण्यात आला. एकूण चारशे कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव अतिशय उत्साही वातावरणात एकत्रित साजरा केला. संस्थेने मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त गतवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जपत आहेत. अशा सामाजिक उपक्रमातून रक्तदान हे श्रेष्ठदान याचे महत्त्व पटवून देतात. सकाळी सात वाजता श्री मार्कंडेय महामुनीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम यांच्या हस्ते करण्यात आले .
शहरातील सिव्हील हॉस्पीटल, डॉक्टर हेडगेवार, इरपप्णा बोल्ली, दमाणी, अश्विनी, सिद्धेश्वर, मेडिकेअर, मल्लिकार्जुन , अक्षय ,सोलापूर रक्तपेढी, बसवेश्वर रक्तपेढी इत्यादी रक्तपेढ्यांनी रक्त संकलन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त तसेच रक्तदान शिबिराचे प्रमुख कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर, संस्था शाखेचे प्राचार्य युवराज मेटे, गीता सादूल, श्रीनिवास चिप्पा, मुख्याध्यापक शारदा गोरट्याल, अजिता पिल्लाई, कल्पना दासरी, पुलकेशी संगा ,व्यंकटेश पोटाबत्ती, मंजुळा कुडक्याल ,नागेश खुने ,उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल, उपमुख्याध्याक मधुकर धर्मसाले, तुकाराम श्रीराम ,पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मलिकार्जुन जोकारे ,परमेश्वर बाबळसुरे तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

























