अक्कलकोट – तालुक्यातील गळोरगी येथे ग्रामदैवत जगदगुरु श्री रेवणसिध्देश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त श्री समर्थ बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित श्री समर्थ कॅाम्प्युटर्स आणि टायपिंग ईन्स्टीट्युट सोलापुर, श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी व गळोरगी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील लहान मुले व मुलींसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने लिंबु चमचा, संगीत खुर्ची व लंगडी ईत्यादी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक स्पर्धेतुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असे तीन बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विजेत्या खेळाडुंना गळोरगीचे सुपुत्र तथा समर्थ कॅाम्प्युटर्सचे संस्थापक गुरुशांत बिराजदार सर यांच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्रक देण्यात आले.या क्रिडा स्पर्धेचे उदघाटन माजी सोसायटी चेअरमन भिमाशंकर आजुरे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थांनी माजी सैनिक बसवराज पाटील हे होते.
आजकालच्या मोबाईल स्मार्ट फोनच्या दुनियेत लहानपणा पासुनच प्रत्येक विद्यार्थांमध्ये क्रिडा विषयी प्रेम, उत्साह, जागरुकता व त्यांचे मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी सर्व स्पर्धेची मांडणी व आखणी केली असल्याचे श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर बिराजदार यांनी सांगितले. सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरीता वे. शरणय्या स्वामी, काशिनाथ कुंभार, शिवानंद बिराजदार सर, प्रकाश मैंदर्गी, सुधाकर प्रचंडे, राहुल पुजारी, राहुल बिराजदार, शशिकांत सुतार , बसवराज पुजारी, शांतप्पा पुजारी , कुमार दिनेश बिराजदार यांनी अथक परीश्रम घेतले.
आपल्या गावातील बाळगोपांळाकरीता समस्त पालकांनी, व गळोरगी ग्रामस्थांनी श्री रेवणसिध्देश्वर मंदीर येथे मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिस पाटील सुरेश मैंदर्गी , ठाकरे शिवसेना गळोरगी अध्यक्ष राजशेखर अंदोडगी , धोंडप्पा सुतार , सिध्दाराम प्रचंडे, सिध्दाराम बिराजदार व गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.स्पर्धेनंतर सर्व गळोरगी गावांतुन विजेत्यांचे व सर्व खेळांडुंचे जंगी मिरवणुक काढण्यात आली. सर्व गळोरगी ग्रामस्थांनी सर्व खेळांडुंचे अभिनंदन करुन सदर कार्यक्रमाची स्तुती देखील केली.

























