पंढरपूर – स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे सगळीकडेच सध्या पडघम वाजलेले आहेत. पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट तसेच सोळा पंचायत समिती गणासाठी निवडणुका लागल्या आहेत. आमदार अभिजीत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून अधिकृतपणे पक्षातर्फे उमेदवार उभे केले आहेत.
सध्या आमदार अभिजीत पाटील हे सर्व ताकतीनिशी पंढरपूर व माढा मध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानात उतरले असून दोन्ही तालुक्यात उमेदवार उभे केले आहेत.
दरम्यान पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटातून काळेनी अर्ज दाखल केला आहे. त्याच अनुषंगाने कल्याणराव काळे व समाधान काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देखील केला असताना त्याच कल्याणराव काळे गटातील माजी पंचायत समिती सदस्य, वाडीकुरोलीचे माजी सरपंच चंद्रकांत पाटील, नंदकुमार पाटील यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्या गटांमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल, विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे, साहेबराव नागणे, शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, रणजीत बागल, धनंजय बागल, सत्यवान नाईकनवरे, उपसरपंच नागेश घोडके यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
———–
कोट
कल्याणराव काळे यांनी सतत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा फेरी सुरू केली आहे. त्यालाच कंटाळून त्यांच्यातीलच ज्येष्ठ मंडळींनी आमच्या सोबत काम करण्याचे ठरवले असून त्यांचा जाहीर प्रवेश देखील झाला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे.विचारधारेचं अनुकरण करून जनतेच्या विकासासाठी नवीन जेष्ठाचं आर्शीवाद आणि तरूण सहकाऱ्यांचं मोलाचं योगदान मिळेल,असा विश्वास आहे.
अभिजीत पाटील (आमदार)


















