Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईसह 15 महापालिकेत असणार महिलाराज! 29  महापौरपदाच्या आरक्षण सोडत जाहीर 

तरुण भारतbyतरुण भारत
January 23, 2026
in mumbai
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून उत्सुकता लागून राहिलेल्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या  महापौरपदासाठीचे आरक्षण सोडत अखेर गुरुवारी काढण्यात आली. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील पंधरा महापालिकामध्ये महिलाराज असणार आहे. मुंबईमध्ये सर्व साधारण महिलासाठी तर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, , पिंपरी-चिंचवड व भिवंडी-निजामपूर या ठिकाणचे महापौरपद  येत्या अडीच वर्षासाठी सर्वसाधारण गटासाठी खुले असणार आहे.

 29 महापालिकासाठी 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. मात्र  महपौरपदाचे आरक्षण सोडत न झाल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात अडीच वर्षासाठी महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली.यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते.

*  29 ठिकाणचे आरक्षण असे:

*अनुसूचित जमातीसाठी राखीव महापालिका – कल्याण-डोंबिवली

अनुसचित जातीसाठी राखीव महापालिका – ठाणे (सर्वसाधारण), जालना (महिला), लातूर (महिला).

* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षण) – जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला

* नागरिकांचा मागास प्रवर्ग  (सर्वसाधारण) – पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर.

* सर्वसाधारण महिला आरक्षण – पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मीरा- भाईंदर, नागपूर, नाशिक.

सर्वसाधारण प्रवर्ग – 

छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर.

  ————-

 असे प्रवर्ग

अनुसूचित जमाती – 1,

अनुसूचित जाती – 3

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8,

सर्वसाधारण – 17

———-

 29 महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकच पद आरक्षित होत आहे. नियमातील तरतुदीनुसार अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी पद देय होत नाही. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3 पदे आरक्षित झाली असून, त्यापैकी 2 पदे अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी 8 पदे आरक्षित झालेली असून, त्यापैकी 4 पदे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत.

उर्वरित 17 महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी 9 पदे येत असून,  8 पदे खुला (सर्वसाधारण) या प्रवर्गासाठी आहेत.

———-

 मुंबईच्या आरक्षण सोडतीमध्ये फिक्सिंग : ठाकरे गटाचा आरोप 

 : मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या आरक्षणात  अनुसुचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण डावलल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आरक्षण सोडतीच्यावेळी गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्याबाबत आक्षेप नोंदविला आहे.

मुंबई महानगरपालिकेत मागील २५ वर्षापासून ओबीसी आणि अनुसुचित जमाती प्रवर्गाला आरक्षण मिळालेले नाही. इतर महानगरपालिकेसाठी जी पद्धत अवलंबली त्यात मुंबईला का बाहेर काढण्यात आले. कारण भाजपा व शिंदे गटाकडे या प्रवर्गातील नगरसेवक नसल्याने मुंबईला त्या सोडतीतून वगळण्यात आले,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नागपूरमध्येही महापौर पदाचे आरक्षण ठरवून करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे  जेष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनीही केला आहे. सत्ताधाऱ्यांनी पहिल्यांदा महापौर कोणाचे करायचे हे ठरविले आहे आणि त्यानंतर आरक्षण काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

——

आरक्षण सोडत नियमानुसार: 

ना.मिसाळ

राज्यातील 29 महापालिक हिच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत नियमानुसार करण्यात आली आहे.  ठाकरे गटाचा आक्षेपाची नोंद घेण्यात आली आहे. त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

: माधुरी मिसाळ ( नगरविकास राज्यमंत्री )

Post Views: 35
Previous Post

मानेगाव येथे गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Next Post

कल्याण काळे गटाला खिंडार…एकीकडे काळे यांचा भाजपमध्ये तर दुसरीकडे त्यांच्या शिलेदारांचा आ. अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कल्याण काळे गटाला खिंडार...एकीकडे काळे यांचा भाजपमध्ये तर दुसरीकडे त्यांच्या शिलेदारांचा आ. अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश

ताज्या बातम्या

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

April 16, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

April 16, 2026
ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

April 16, 2026
आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

April 16, 2026
जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 16, 2026
शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

April 16, 2026
जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

April 16, 2026
निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0812271

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697